Washim News वाशिम: कंत्राटदाराच्या हलगर्जीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या बाजूला सांडलेल्या डांबरात फसून दोन गायींचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर एक गाय गंभीर जखमी असल्याची माहिती हाती आली आहे. हा धक्कादायक प्रकार वाशिम-पुसद मार्गावरील शेलू बु. या (Washim News) फाट्यानजीकच्या रस्त्यावर घडला आहे. त्यामुळे कंत्राटदाराचा हलगर्जीपणा निष्पाप गाईच्या जीवावर बेतला असल्याचे यातून उघड झाले आहे. परिणामी, परिसरातील इतर जनावरांचा जीवही या डांबरमुळे धोक्यात येत आहेत. हे सांडलेले डांबर तात्काळ हाटवा, अन्यथा संपूर्ण ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन छेडतील, असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


कंत्राटदाराचा हलगर्जीपणा बेतला निष्पाप गाईच्या जीवावर


वाशिम-पुसद रस्त्याचे काम करण्यात येत असताना शेलू बु. फाट्यानजीक कंत्राटदाराने 25 ते 30 डांबराच्या टाक्या रस्त्याच्या कामासाठी आणल्या होत्या. त्यातल्या काही कामात आल्या तर त्यातील काही मात्र तशाच रस्त्याच्या कडेला पडून होत्या. दरम्यान, अलिकडे उन्हाचा पारा वाढल्यानर त्यातील डांबर पातळ होऊन रस्त्याच्या नालीत सांडले. त्यामुळे ही नाली जवळ जवळ 100 फूट अंतरापर्यंत डांबराने तुडुंब भरली. दरम्यान, चारा आणि पाण्याच्या शोधात असलेली काही जनावरे या ठिकाणी आली असता ते या सांडलेल्या डांबरात फसल्या.


अतोनात प्रयत्न करून देखील यात दोन गायी बाहेर येऊ न शकल्याने त्यात दोन गायींचा तडफडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. तर एक गाय गंभीर जखमी असल्याची माहितीही हाती आली आहे. हे सांडलेले डांबर तात्काळ हाटवा, अन्यथा संपूर्ण ग्रामस्थ रस्ता रोको आंदोलन छेडतील, असा आक्रमक पवित्रा घेत ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. आता या प्रकरणी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


आंबे विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीला आग


अकोल्यात एका बैलगाडीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. अकोला शहरातल्या सिव्हिल लाइन चौकात बैलगाडीवर आंबे विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याच्या बैलगाडीला ही आग लागली आहे. विद्युत पोल वरील स्पार्किंगमुळे शॉर्टसर्किट होऊन बैलगाडीला आग लागली असल्याच समजते आहे. या आगीत शेतकऱ्यांनं विक्रीसाठी आणलेले आंबे पूर्णपणे जळाले आहेत. शेतकर्‍याच्या विविध साहित्यासह शेतमालाची अक्षरक्ष: राखरांगोळी झाल्याने या शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकाऱ्यावर पुन्हा एक संकट कोसळल्याची भावना या शेतकऱ्याने बोलून दाखवली आहे.


इतर महत्वाची बातम्या