Pune Porsche Car Accident : पुणे : पुणे पोर्शे अपघातात (Pune Porsche Accident) लाडावलेल्या धनिकपुत्रानं दोन इंजिनिअर्सना कारखाली चिरडलं. अपघात घडल्यापासूनच याप्रकरणात अनेक धक्कादायक आणि आश्चर्यकारक गोष्टी घडल्या. याप्रकरणानंतर पुण्यातील पबवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याचप्रकरणी आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे एक्साईजला जबाबदार धरलं आहे. अंधारे आणि धंगेकर दोघांनीही थेट पुणे एक्साईजचं कार्यालय गाठलं आणि पुणे एक्साईजच्या अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले आहेत.
अंधारे आणि धंगेकरांच्या आरोपानंतर पुणे एक्साईजच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी ते म्हणाले की, "आमच्यावर केले जात असलेले आरोप पर्णतः चुकीचे आरोप आहेत. तरीसुद्ध पुणे एक्साईज विभागाचा प्रमुख म्हणून यामध्ये काही होत असेल, तर याबाबत चौकशी आम्ही करू आणि याप्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाचा कार्यभार स्विकारल्यापासून दोन वर्षांत जवळपास 8 हजार गुन्हे विभागाकडून दाखल करण्यात आलेले आहेत. या विभागाचा प्रत्येक माणूस पुणेकरांसाठी झगडतोय. तुमची जी स्वप्न आहेत पुणेकरांसाठी तीच आमचीदेखील आहेत.
सुषमा अंधारेंनी कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची यादीच वाचली!
सुषमा अंधारे यांनी अबकारी विभागाची अक्षरशः लाज काढत पुण्यामधील कोणत्या हॉटेलमधून, पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो याची यादीच वाचून दाखवली. काही हजारांपासून ते लाखांपर्यंत ही यादी असल्याचे सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवलेल्या यादीतून समोर आले. यावेळी शांत उभे राहून ऐकून घेण्याची वेळ विभागाच्या अधिकाऱ्यांवर आली. सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर यांनी यांनी कार्यालयामध्ये पोहोचत पब संस्कृतीवर एक प्रकारे हातोडा टाकताना कारवाई कधी करणार? अशी विचारणा करत विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. अंधारे यांनी माध्यमांच्या कॅमेरांसमोरच पुण्यातून कोणत्या हॉटेलमधून कोणत्या पबमधून किती रुपयांचा हप्ता जातो, याची माहिती दिली.
पाहा व्हिडीओ : Sushma Andhare Pune : सुषमा अंधारे, Ravindra Dhangekar एक्साईजच्या कार्यालयात, पुण्यातील पबला विरोध