Washim News वाशिम: देशातील विविध राज्यांमध्ये उन्हाच्या झळा (Heat Wave) बसत आहेत. अशातच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कुठे अवकाळी पावसाचा इशारा (Unseasonal Rain) देण्यात आला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट (Heatwave) असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने नवे उच्चांक गाठले असून त्यात रोज नवे बदल होत आहे. या वाढत्या उन्हाचा फटका मनुष्याप्रमाणेच वन्यजीवांनाही बसताना दिसत आहे. अशातच वाशिम (Washim News) जिल्ह्यात अलिकडे वाढलेल्या तापमानामुळे शहरातल्या पद्म तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तलावातील पाण्याने तळ गाठल्याने यात सुमारे चार ते पाच क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची बाब उघड झाली आहे. 


तलावातील चार ते पाच क्विंटल माशांचा दुर्दैवी मृत्यू


सध्याघडीला विदर्भातील जवळ जवळ सर्व जिल्ह्यातील उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठे तलाव आणि धरणांनीही तळ गाठायला सुरवात केली आहे. परिणामी, राज्यात पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. अशातच या वाढत्या उन्हाचा फटका मनुष्याप्रमाणेच वन्यजीवांनाही बसताना दिसत आहे. वाशिम शहरातील पदमपुराणात उल्लेख असलेल्या भगवान पदमेश्वर येथील पद्म तलावातील पाणी सुकल्याने चार ते पाच क्विंटल माशाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. गेल्या सात ते आठ दिवसापासून वाढलेले तापमानामुळे तलावातील पाणी आटल्याचे चित्र आहे.


परिणामी, माशाचा मृत्यूसाठी हेच कारण कारणीभूत असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे वाढत्या तापमानामुळे उरलेल्या इतर ठिकाणच्या पाण्यातील मासे मारण्याचा प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आता उरलेल्या फक्त दोन कुंडामध्ये थोडे पाणी शिल्लक असल्याने त्या कुंडात जीवित असलेल्या माशाचा वाढत्या तापमानामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी वेळीच योग्य त्या उपाययोजना करणे अपेक्षित आहे.


उन्हाच्या काहिलीनं T4 वाघिनीनं मांडला पाणवठ्यात ठिय्या


सध्या विदर्भातील उष्णतेचा पारा उच्चांकी गाठत आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत 40 अंश सेल्सिअस तापमानाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या प्रखर उष्णतेचा त्रास मानवालाचं नाही तर, जनावरांनाही आता होऊ लागला आहे. रखरखत्या उन्हाच्या काहीलीपासून स्वतःची सुटका कशी करता यावी, याचा विचार मानवासोबतचं पशुपक्षी करताना दिसत आहेत.


नवेगाव - नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचं दर्शन होत असल्यानं पर्टकांचा ओढा सध्या इकडं बघायला मिळत आहे. अशात कालच्या सायंकाळच्या जंगल सफारी दरम्यान T-4 वाघीण प्रखर उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जंगलातील एका पाणवठ्यावर पोहचली आणि थेट पाण्यात बस्तान मांडून स्वतःची तृष्णतृप्ती केली. याचा व्हिडिओ आता समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होतोय.


इतर  महत्वाच्या बातम्या