वाशिम : वाशिम जिल्ह्यातील रिसोड इथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे मृतदेह शेतामधील विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे दोघे मित्र तीन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते.

इक्बाल खान आणि रेहानोद्दीन अशी या तरुणांची नावं असून हे दोघेही 27 ते 28 वर्षांचे आहेत. या तरुणांचे मृतदेह आज रिठद इथल्या शेतशिवारात असलेल्या विहिरीत आढळले.



विहिरीजवळ दोघांचे कपडे आणि मोबाईलही सापडले आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की हत्या, याचा शोध वाशिम ग्रामीण पोलिस घेत आहेत.