वर्धा : आजपर्यंत आपण हजारो रुपयांची लाच घेताना अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक करण्यात आल्याची बातमी ऐकली असेल. पण वर्ध्यातील पशुधनविकास अधिकारी आणि शिपायाला केवळ 60 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक झाली आहे.


वर्ध्यातील हिंगणघाट पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या तरोडा येथील ही घटना आहे.

तरोडा येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यातील सहाय्यक पशुधनविकास अधिकारी दत्तात्रय कुंटेने 100 टक्के अनुदानावरील ज्वारीच्या चाराच्या बियाण्यासाठी लाच मागितली होती. बियाण्याचा दोन बॅगेच्या मागणीसाठी प्रत्येकी 30 रुपये प्रमाणे 60 रुपयांची मागणी केली होती.

ही रक्कम रवींद्र रक्कम याच्याकडे देण्यास सांगितली होती. यासंदर्भातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि शिपायाच्यातील फोन संभाषणाद्वारे दोघांना लाच लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहाथ अटक केली आहे.

त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती लाच लुचपतने दिली.