Washim Accident: राज्यात रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढलेले असताना कधी चालकाच्या चूकीने तर कधी रस्ता न दिसल्याने, भरधाव वेगात नियंत्रण सुटल्याने तर रस्त्याच्या कामांमुळे दिवसागणिक अपघात वाढले आहेत. दरम्यान, वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिसोड सेनगाव मार्गावर शाही ढाब्याजवळ क्रुझरचा भीषण अपघात झाला. अंदाज चुकल्याने गाडी मातीच्या ढिगाऱ्याला धडकून 19 प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. यात दोन जणांची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना उपचारासाठी स्थानिक रिसोड ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. रात्री घडलेल्या या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्थानिकांनी या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले असून निर्माणाधीन रस्त्याचे काम सुरु असल्याने क्रूझर चालकाचा अंदाज चुकल्याचे सांगण्यात येत आहे.(Washim Accident)
क्रूझर मातीच्या ढिगाऱ्यावर आदळून अपघात
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात रिसोड-सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ भीषण अपघात झाला. रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. निर्माणाधीन रस्त्याचे काम सुरू असताना, क्रूझर गाडी चालवणाऱ्या चालकाचा अंदाज चुकल्याने गाडी मातीच्या ढिगाऱ्याला धडकली. या अपघातात 19 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. स्थानिकांनी तातडीने मदत कार्य सुरू करून जखमींना रुग्णालयात पोहोचवले. प्राथमिक उपचारासाठी सर्व जखमींना रिसोड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रिसोड-सेनगाव मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
पोलीस भरती करणाऱ्या तरुणांचा दु:खद अंत
बीड-परळी महामार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास एसटी बसने व्यायामासाठी गेलेल्या तीन तरुणांना उडवले. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या या तिनही तरुणांचा या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. हे तरुण नेहमीप्रमाणे पहाटे व्यायाम करण्यासाठी जात होते. मागून भरधाव वेगात येणाऱ्या एसटी बसने तरुणांना जोरदार धडक दिली. बीड जवळील घोडका राजुरी येथील पोलीस भरतीचा सराव करताना 5 जणांना एसटी बसने चिरडल्याची घटना घडली असून 3 जण जागीच ठार झाले असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर परिसरात संतापाचे वातावरण आहे. यामधील सुबोध बाबासाहेब मोरे (वय 20) , विराट बब्रूवान घोडके (वय 19) आणि ओम सुग्रीव घोडके (वय 20) हे तीन युवक सर्वसामान्य कुटुंबांतील होते.
हेही वाचा: