Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असणारा वाल्मीक कराडला (Walmik Karad) मकोका अंतर्गत 7 दिवसांची कोठडी संपल्यानंतर आज ( 22 जानेवारी) बीडच्या विशेष न्यायालयाने वाल्मीक कराडला 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे . वाल्मीक कराडला बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते . वाल्मीक कराड याच्यावर नको का अंतर्गत दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणी आज न्यायालयात सुनावणी झाली . पोलीस कोठडीत वाल्मीक कराड आजारी पडल्याचं वैद्यकीय तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी माध्यमांना सांगितलं . पोलीस कोठडीत आजारी पडल्याने वाल्मीक कराडला जेलमध्ये CPAP मशीन देण्यात यावी अशी मागणी वाल्मीक कराडच्या वकिलांनी केली आहे . CPAP मशीन झोपताना श्वासोच्छवासातील व्यत्यय दूर करण्यासाठी वापरली जाते . भारतात या मशीनची साधारण किंमत 35 ते 60 हजार रुपये आहे . (Beed)


वाल्मीक करडांची वैद्यकीय तपासणी,डॉक्टर म्हणाले ..


बीडच्या विशेष सत्र न्यायालयाने वाल्मीक कराड यांना दिलेली कोठडी आज संपली होती . त्यामुळे वाल्मीक कराड यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले .  न्यायालयात हजर करण्यापूर्वी वाल्मीक कराडची वैद्यकीय पथकाने तपासणी केली . वाल्मीक कराडच्या प्रकृती संदर्भात डॉक्टर अमोल जोगदंड यांनी वाल्मीक कराड यांना सर्दी खोकल्याचा त्रास आहे . त्यांना गोळ्या औषध दिली आहेत . सध्या त्यांची तब्येत चांगली असल्याचं सांगितलं . सर्दी खोकला ताप यासाठीचा गोळ्या वाल्मीक कराड यांना दिल्याची माहिती डॉक्टर जोगदंड यांनी दिली . वाल्मीक करडांचे पल्स,ब्लड प्रेशर,टेंपरेचर चेक करण्यात आले.सर्दी ,खोकला , ताप असल्याने त्यांना गोळ्या देण्यात आल्या असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं . दरम्यान,वाल्मीक कराड यांच्या वकिलांनी पोलीस कोठडीत आजारी पडल्याने वाल्मीक कराडला जेलमध्ये CPAP मशीन देण्यात यावी अशी मागणी केली आहे . यापूर्वीही वाल्मीक कराडांकडून न्यायालयात याची का दाखल करण्यात आली होती,ज्यात वाल्मीक कराड यांना कोठडीत 24तास मदतनीस देण्याची मागणी करण्यात आली होती.वाल्मीक कराडला स्लीप एपनया नावाचा आजार असल्याचा दावा याचिकेत केला होता . (Walmik Karad)


काय आहे स्लिप एपनिया आजार ?


स्लीप इंडिया ही एक गंभीर समस्या असून आरोग्य तज्ञांच्या मते हा आजार असलेल्या व्यक्तीला झोपेच्या वेळी श्वास घेणे बंद होतं . तुमचा मेंदू पुरेसा जागृत राहून तुमचे रक्षण करण्याचे काम करत असताना ही समस्या तुमच्या झोपेत अडचण निर्माण करते .स्लिप अपनिया हा झोपेचा विकार आहे . ज्यामध्ये झोपताना श्वास घेण्यास त्रास होतो ' झोपेत असताना वारंवार श्वासोच्छवास थांबणे . ज्यामुळे मेंदू आणि शरीराला पुरेसं ऑक्सिजन न मिळणे या समस्या उद्भवतात .


हेही वाचा:


Walmik Karad: वाल्मिक कराडला झालेला 'स्लीप एपनिया' आजार नेमका काय आहे? पुरुषांना धोका अधिक? तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या...