Walmik Karad : खंडणी प्रकरणतील आरोपी वाल्मिक कराडला केज न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे. वाल्मिक कराडला न्यायाधिशांपुढे हजर केलं असून, सुनावणीला सुरुवात झाली आहे. खंडणी प्रकरणी पोलिसांनी वाल्मिक कराडच्या 15 दिवस पोलिस कोठडीची मागणी केली आहे. थोड्याच वेळापूर्वी वाल्मिक कराडला केज रुग्णालयातून केज पोलिस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता केज न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. 


दरम्यान, केज न्यायालय परिसरात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये वाल्मिक कराड यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा देऊन सर्व कार्यकर्त्यांना न्यायाल्यासमोरून हुसकावून लावलं आहे. केज न्यायालय आणि केज पोलीस स्टेशनसमोरील संपूर्ण रस्ता पोलिसांमार्फत निर्मनुष्य केला जात आहे. या मार्गांवरील वाहतूक सुरु असली तरी रस्त्यावर कोणी थांबणार नाही याची खबरदारी पोलीस घेत आहेत.


वाल्मिक कराड यांच्याविरोधत केज पोलीस स्टेशनला खंडणीची फिर्याद


वाल्मिक कराड यांच्याविरोधत केज पोलीस स्टेशनला खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. यानंतर आज वाल्मि कराड आज पोलिसांना शरण आला आहे. दरम्य शरण येण्यापूर्णी वाल्मि कराडने एक व्हिडीओ प्रकाशीत केला होता. यामध्ये तो म्हणाला की, मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना, सीआयडी ऑफिस, पुणे पाषाण रोड येथे सरेंडर होत आहे. संतोष भैया देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची शिक्षा द्यावी, राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष येतील आणि मी त्यात दोषी दिसलो, तर न्यायदेवता जी शिक्षा देईल, ती भोगायला मी तयार आहे, असे वाल्मिक कराड यांनी व्हिडीओत  म्हटले आहे.


मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून कराड फरार होता.  मात्यार, आज वाल्मिक कराडने सीआयडीसमोर शरणागती पत्करली आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. तर अद्याप काही आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मिक कराड सूत्रधार असल्याचा दावा केला जात आहे. वाल्मिक कराडचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता. मात्र, कराड आज शरण आला आहे.  


महत्वाच्या बातम्या:


Walmik Karad : वाल्मिक कराड 3 दिवस पुण्यातच होता, सोबत आलेल्या नगरसेवकांनी मार्गच सांगितला!