एक्स्प्लोर

दारुबंदीसाठी गावात मतदान, महिलाशक्तीचा एकतर्फी विजय

गोंदिया जिल्ह्यातील खमारी गावात दारुबंदी करण्यासाठी मतदान घेण्यात आलं. महिलाशक्तीच्या या विजयानंतर गावात रॅली काढत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं.

गोंदिया : दारुबंदीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत महिलाशक्तीचा दणदणीत विजय झाला. गोंदिया जिल्ह्यातील खमारी गावात दारुबंदी करण्यासाठी मतदान घेण्यात आलं. महिलाशक्तीच्या या विजयानंतर गावात रॅली काढत जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. खमारी गावात गुन्हेगारी वाढत आहे, लहान मुलांना व्यसनं लागत आहेत. या समस्या लक्षात घेत महिलांनी गावातील परवानाधारक आणि अवैधरित्या दारु विकणाऱ्या दुकानावर अनेकदा मोर्चे काढले. संपूर्ण गावात दारुबंदी करण्याचा निर्णय घेतला. मात्र गावातील दारु व्यावसायिकांनी दुकाने बंद न केल्याने अखेर महिलांनी कायदा हातात घेतला. गावात चालणाऱ्या दारु दुकानात घुसून तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर महिलांवर पोलिसांनी फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा प्रशासनाने महिलांचा दिवसेंदिवस दारु विरोधातील वाढता रोष पाहता गावात ग्रामसभा घेऊन दारुबंदी करण्याचा ठराव मागितला. महिलांनी मोठ्या प्रमाणात दारुबंदीला समर्थन दिल्याने अखेर जिल्हा प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करत खामरी गावात दारुबंदीसाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला. रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात निवडणुकीला सुरुवात करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान घेण्यात आलं. 3398 महिलांनी मतदान करायचं होतं. मात्र 2180 महिलांनी मतदान केलं. यात आडव्या बाटलीला 1857 मते मिळाली, तर उभ्या बाटलीला केवळ 173 मते मिळाली. 150 मतं अवैध ठरवण्यात आली. अंतिम निकालात नारी शक्तीचा दणदणीत विजय झाल्यामुळे गावात रॅली काढून जल्लोष करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Congress Morcha: E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
E20 इंधनाविरोधात नागपुरात युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक; नितीन गडकरींच्या निवासस्थानावर जनआक्रोश मोर्चा, राजीनाम्याची आग्रही मागणी
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Maharashtra Live Breaking Marathi News: उधळपट्टी थांबवा, जनतेचा पैसा विकासकामांसाठीच खर्च करा; इनोव्हा गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावर देवेंद्र फडणवीसांची नाराजी
Mumbai Crime News: आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!
आधी गळा आवळून 35 वर्षीय व्यक्तीला संपवलं, नंतर हात बांधून बॉडी पाण्याच्या टाकीत फेकली अन्...; मुंबई हादरली!

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinesh Phogat On Brij Bhushan Sharan Singh: लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
लैंगिक छळाच्या आरोपातून बृजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता; विनेश फोगाट यांची पहिली प्रतिक्रिया, सगळं सांगून टाकलं!
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Bankipur By-election Prashant Kishor: प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
प्रशांत किशोरांची बांकीपुरात निर्णायक आघाडीकडे वाटचाल, भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात तगडा हादरा बसल्याने पक्षासह ऑफिसमध्येही अभुतपूर्व सन्नाटा
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
पिंपरी चिंचवडच्या कुटुंबाने आयुष्य संपवण्यासाठी निवडला भयानक वेदनादायी मार्ग, विषारी सोडियम नायट्रेटचा धूर फुफ्फुसात गेला अन्....
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
Embed widget