एक्स्प्लोर
भाजपला मतदान करा, शिवसेना आमदाराचं जाहीर आवाहन
शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. याची जाहीर माहिती त्यांनी व्यासपीठावरुन दिली.

नांदेड : राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजप सत्तेत एकत्र आहे. एकत्र सत्तेत असूनही दोन्ही पक्षांची सतत एकमेकांवर कुरघोड्या सुरु असतात. पण शिवसेनेच्या विद्यमान आमदाराने जाहीर सभेत भाजपला मतदान करून विजयी करण्याचं आवाहन केलं आहे. सध्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगारमंत्री संभाजी निलंगेकर हे नांदेडच्या सभेत भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या व्यासपीठावर शिवसेनेचे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते. प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. याची जाहीर माहिती त्यांनी व्यासपीठावरुन दिली. शिवाय नांदेड महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपचाच महापौर झाला पाहिजे, असंही आवाहन त्यांनी केलं. अशोक चव्हाणांवर टीका करताना निलंगेकरांची जीभ घसरली सभेत भाजप मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य हे नेहमीचंच झालं आहे का, असा प्रश्न निर्माण झाल आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता संभाजी निलंगेकर यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा जाहीर भाषणात ‘रावण’ असा उल्लेख केला.
Before You Go
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















