एक्स्प्लोर

...तर उदयनराजेंना अटक करु: विश्वास नांगरे-पाटील

कोल्हापूर : कायदा सर्वांसाठी समान आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यावरही कारवाई होईल, असं कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ठणकावून सांगितलं. इतकंच नाही तर गरज पडल्यास  उदयनराजेंवर अटकेची कारवाई करणार असल्याचंही नांगरे पाटील यांनी सांगितलं. खंडणी आणि जिवे मारण्याच्या आरोपाखाली उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. "या केसमध्ये खूप प्रोफेशन पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन सुरु आहे. त्यातील 9 आरोपी यापूर्वीच अटक केले आहेत. खासदारांचा जामीन फेटाळलेला आहे. तपास अधिकारी पुरावे जमा करुन कारवाई कशा पद्धतीने करायची त्याकडे लक्ष आहे. स्वत: पोलीस अधिक्षकांच्या देखरेखीखाली या खटल्याचा तपास सुरु आहे. कायदा हा सर्वांना सारखाच असतो, गरज पडल्यास कारवाई होईल", असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. काय आहे नेमकं प्रकरण? सातारा जिल्ह्यातील लोणंद शहराजवळ सोना अलाईज नावाची कंपनी आहे. या कंपनीत उदयनराजे यांच्या नेतृत्वात काम करणारी एक माथाडी कामगार संघटना आहे, तर दुसऱ्या संघटनेचं नेतृत्व रामराजे निंबाळकर करतात. कंपनी रामराजेंच्या संघटनेला झुकतं माप देते, त्यांना अधिक काम देते, असा उदयनराजेंचा आरोप होता. त्यामुळे 18 फेब्रुवारीला त्यांनी कंपनीचे अधिकारी राजकुमार जैन यांना सातारा विश्रामगृहात बोलावून घतलं. उदयनराजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकुमार जैन यांना तिथे मारहाण केली आणि काही ऐवज काढून घेतला, अशी तक्रार जैन यांनी सातारा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर उदयनराजे आणि त्यांच्या साथीदारांवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित बातम्या  साताऱ्यात उदयनराजेंवर मारहाण आणि खंडणीचा गुन्हा दाखल  उदयनराजेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, अटकेची शक्यता 

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar Protest : रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
रोहित पवारांच्या आंदोलनाला विरोध नाही, पण पक्षाचा झेंडा आणि चिन्ह घेऊन लढल्यास...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट 
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार

व्हिडीओ

Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Nitin Gadkari News :40 टक्के प्रदूषणाला माझा विभाग जबाबदार, नागपुरात नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Kareena Karisma Kapoor Supriya Sule: कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
कपूर कुटुंबाची संडे पार्टी जोरदार, करिश्मा - करीना कपूरसोबत सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती, पाहा कोण बनलं शेफ!
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
NEET सह सर्वच परीक्षांच्या आयोजनासाठी उच्चस्तरीय समिती; एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्याचा सहभाग वाढणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Maharashtra Government Doctors Demands : सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
सरकारी डॉक्टरांसाठी खुशखबर! आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांचा मोठा निर्णय; 10 सदस्यीय उच्चस्तरीय समिती गठीत
Embed widget