नवी दिल्ली : राज्यातील लोकसभा निवडणुकीत यंदा लक्षणीय लोकसभा मतदारसंघ ठरला, तो सांगलीची. राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंत दादा पाटील यांच्या नातवाने इच्छा जाहीर करुनही काँग्रेसला ही जागा सुटली नाही. त्यामुळे, महाविकास आघाडीच्या (Mahavikas aghadi) जागावाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शिवसेना ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. त्यानंतर, काँग्रेसकडून तयारी केलेल्या आणि इच्छुक असलेल्या विशाल पाटील (Vishal Patil) यांनी बंडखोरी करत अपक्ष लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. आता, लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील सर्वच खासदार दिल्लीत पोहोचले आहे. आज खासदार विशालcus पाटील यांनी संसदेत आपलं पहिलं भाषण केलं आणि सांगली (Sangli), कोल्हापूर (kolhapur) व सामीवासीयांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित केला.


विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच संसदेत पद व गोपनियतेची शपथ घेतली. पाटील यांच्यासह महाराष्ट्रातून पहिल्यांदाच दिल्लीत पोहोचलेल्या इतरही खासदारांनी शपथ घेतली. त्यामध्ये, निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण, इंग्रजी येत नसल्याच्या मुद्द्यावरुनच त्यांना माजी खासदार व त्यांचे प्रतिस्पर्धी सुजय विखे यांनी डिवचलं होतं. त्यानंतर, आता सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनीही इंग्रजीत भाषण करुन पहिल्यांच प्रश्नाने सांगली व कोल्हापूरकरांचं मन जिंकलं आहे. 


2005, 2019 आणि 2021 नंतर आजही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे, CWC गाईडलाईनुसार या धरणांची उंची वाढविण्याचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं. विशाल पाटील यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात महाराष्ट्राच्या सातारा, सांगली व कोल्हापूरमधील प्रश्नांना हात घातला. कृष्णा नदीवरील साताऱ्यातील कोयना धरण आणि कर्नाटक व महाराष्ट्र सीमारेषेवरील आलमट्टी धरणासंदर्भातील प्रश्न विशाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीची माहिती देत मोठं नुकसान झाल्याचंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं. या पूरस्थितीमुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं असून अनेकांचे जीव गेले आहेत, या पुरामध्ये जनावरंही वाहून गेल्याचं विशाल पाटील ससंदेत बोलताना म्हणाले. 


विशाल पाटील यांचा काँग्रेसला पाठिंबा


दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अपक्ष मैदानात उतरत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील व महायुतीच्या संजय काका पाटील यांचा पराभव केला. विशेष म्हणजे काँग्रेसने या निवडणुकीत माघार घेतली तरीही स्थानिक नेत्यांनी छुप्यारितीने विशाल पाटील यांनाच मदत केली. त्यामुळे, अपक्ष निवडणूक लढवूनही विशाल पाटील यांनी विजय मिळवला. निवडणूक निकालानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसला आपला पाठिंबाही जाहीर केला आहे. तर, काँग्रेसकडूनही त्यांच्यावर बेशिस्त किंवा बंडखोरी केल्याबाबत कुठलाही कारवाई करण्यात आली नाही. 


हेही वाचा


मुख्यमंत्र्यांनी अवमान केला; आमदार जगताप यांचा गंभीर आरोप; माजी मंत्री विजय शिवतारे निशाणाऱ्यावर