एक्स्प्लोर
Advertisement
Viral Video : खिडकीतून ST बसमध्ये चढण्याचा प्रयत्न, विद्यार्थी खिडकीसहीत कोसळला, बसची दुरावस्था समोर
एक मुलगा एस. टी. बसमध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ST बसची खिडकी तुटून मुलगा खाली कोसळला आहे.
Viral Video News : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ (Viral Video) जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे माहीत नाही. शाळा सुटल्यावर शाळकरी मुलं ST बसमध्ये जागा पकडण्यासाठी जीवघेणी कसरत करताना दिसतात. असाच एक मुलगा एस. टी. बसमध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ST बसची खिडकी तुटून मुलगा खाली कोसळला आहे. यानिमित्ताने राज्यातील एस टी बसेसची दुरावस्था ही समोर आली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशी जीवघेणी कसरत विद्यार्थ्यांनी करू नये असं आवाहन एबीपी माझा कडून करण्यात येत आहे.
एसटी बसमध्ये चढताना विद्यार्थ्यांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. घाई गरबड करु नये, अन्यथा धोका होऊ शकतो. दरम्यान, या व्हायरल झालेल्या व्हिडीओतून एसटी बसची दुरावस्था समोर आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
निवडणूक
निवडणूक
Advertisement