पुणे : कोरेगाव-भीमा गावात असा प्रकार यापूर्वी कधीही घडला नव्हता. सगळं गाव एकत्र नांदतं. आम्ही आधीही एकत्र होतो, यापुढेही एकत्र राहू. गावात घडलेला प्रकार बाहेरच्या व्यक्तींकडून झाला आहे, असा आरोप कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी केला आहे.

कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनीही सामाजिक सलोख्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचाच भाग म्हणून गावातील दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेल्या प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप केला.

थर्टी फर्स्ट ते महाराष्ट्र बंद, पोलीस ऑन ड्युटी 72 तास

1 जानेवारीला कोरेगाव-भीमा गावात दलित बांधव विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी आले होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात गावातील दुकानं फोडली, गाड्यांची तोडफोड केली, लहान मुलं-महिलांनाही त्रास झाला. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करा. तसंच गावात झालेल्या तोडफोडीमध्ये ज्यांचं नुकसान झालं, त्यांचे पंचनामे करुन सरकारने मदत करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.

कोरेगाव-भीमामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबाकडून शांततेचं आवाहन

तीन दिवस लाईट-पाणी नाही!
व्हायरल बातम्यांमुळे कोरेगाव भीमा गावाची बदनामी झाली आहे. आमच्या गावावर सर्वाधिक अन्याय झाला आहे. तीन दिवस गावात लाईट नाही, पाणी नाही. मात्र सरकारचं आमच्याकडे लक्ष नाही. 31 डिसेंबरला रामदास आठवले आणि पालकमंत्र्यांनी इथे येऊन पाहणी केली होती. पण त्यानंतर एकही नेता इथे फिरकला नाही, असा संतापही ग्रामस्थांनी व्यक्त केला.

वढूमध्ये दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची बैठक, अॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घेण्याची तयारी

मृताच्या कुटुंबीयांना एक कोटी द्या!
1 जानेवारीच्या हिंसाचारात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. गावातील तरुणाची हत्या होणं क्लेशदायी आहे. सरकारने राहुल फटांगडेच्या कुटुंबाला एक कोटींची मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

स्थानिकांमध्ये जातीय भेद नाही. गावात दलित बांधवांची सेवा होते, इथे वाद आणि जातीय तेढ नाही. त्यामुळे आमच्या गावाचा या अनुचित घटनेशी काहीही संबंध नाही, असा दावा कोरेगाव-भीमाच्या ग्रामस्थांनी केला आहे.

भीमा कोरेगावप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांचं राज्यसभेत निवेदन

अनुचित घटनेला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार
गावात हिंसाचार कोणी घडवला, हे सरकारने शोधून काढावं. तो कोणत्याही समाजाचा नागरिक असो, कारवाई झालीच पाहिजे. हिंसाचारात गावकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. या अनुचित प्रकाराला सरकारचा हलगर्जीपणा जबाबदार आहे. प्रशासनाने पुरेशी सुरक्षा दिली नाही, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

कोरेगाव-भीमा गावाची बदनामी थांबवावी आणि सरकारने नुकसान भरपाई द्यावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचं ग्रामस्थ म्हणाले. तसंच दलित आणि मराठा समाजाने शांतता राखावी, असं आवाहनही गावकऱ्यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या

भिडे गुरुजींवरील गुन्हा मागे घ्या, सांगलीत समर्थनार्थ मोर्चा

दलित तरुणांची धरपकड तात्काळ थांबवावी : प्रकाश आंबेडकर

दलित समाज धाकटा भाऊ, सर्वांना एकत्र नांदायचं आहे : छत्रपती संभाजीराजे

सणसवाडी दगडफेकीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद

पुण्यातील सणसवाडीत दोन गटात वाद, परिस्थिती नियंत्रणात

सणसवाडी दगडफेकीची न्यायालयीन चौकशी होणार : मुख्यमंत्री

सरकारने पुरेशी खबरदारी घ्यायला हवी होती : शरद पवार


पाहा व्हिडीओ