मुंबई : सध्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या हत्या सत्रामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पुण्यात दोन बहि‍णींचीही हत्या करण्यात आली. पुणे शहरातच सतिश वाघ यांचीही हत्या झाली. या सर्व घटनांमुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हाच मुद्दा लावून धरत विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. जाग येण्यासाठी आणखी किती वाट पाहताय? असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे.


गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट


विजय वडेट्टीवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी सरकारला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात अभं केलंय. "बदलापूर...आता कल्याण, पुणे ! जाग येण्यासाठी सरकार आणखी किती घटनांची वाट बघतंय? कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळी याच्यावर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका बालिकेवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. हे अत्यंत संतापजनक असून यावरून राज्यातील पोलीस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते, असा आरोप वडेट्टीवार यांनी केली. 


राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा


तसेच, "बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे, हे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. राजगुरुनगर, पुणे येथे दोन निष्पाप बहिणींची हत्या हा देखील संतापजनक प्रकार आहे. खेळता खेळता हरवलेल्या या मुलींच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गुन्हेगार निर्भयपणे वावरत आहेत, हे सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे," अशी घणाघाती टीका त्यांनी केली.




या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी


राज्यात महिला आणि लेकी निर्भयपणे फिरू शकत नाही. इथे गुंड, बलात्कारी निर्धास्तपणे फिरत आहेत. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून महायुती सरकारला जबाबदारी स्वीकारावी लागेल. या दोन्ही घटनांतील गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलीस आणि न्यायव्यवस्थेने ठोस पावले उचलावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली. 


हेही वाचा :


Satish Wagh Case: पोलिसांसमोर मोहिनी वाघ यांचं रडण्याचं नाटक, पण जवळच्या व्यक्तीने अनैतिक संबधांची टीप पोलिसांनी दिली अन्...


नऊ वर्षाचा मुलगा राहायला आला, 21 व्या वर्षी पहिल्यांदा अनैतिक संबंध, 32 वर्षापर्यंत अक्षयची मोहिनी वाघांशी जवळीक 


Satish Wagh Case : 48 वर्षांच्या मोहिनी वाघ यांचं 32 वर्षांच्या इंजिनिअरसोबत अफेअर, भाड्याच्या खोलीत अनैतिक संबंधांना अंकुर फुटला