Pankaja Munde on Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामध्ये एसआयटी नेमण्याची पहिल्यांदा मागणी मीच गोपीनाथगडावरून केली होती आणि या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला होता. सध्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीस आहेत आणि ते लेकराला नक्की न्याय देतील आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा न्याय देतील अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज दिली. पंकजा मुंडे आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी पोहोचल्या. यावेळी बोलताना त्यांनी संतोष देशमुख प्रकरणावर भाष्य केलं.



संतोष देशमुख माझाच बूथप्रमुख


म्हणून पंकजा मुंडे यांनी सांगितले की संतोष देशमुख हा माझाच बुथप्रमुख होता. या प्रकरणामध्ये पहिली एसआयटी नेमण्याची मागणी मी गोपीनाथ गडावरून केली होती. फडणवीस न्याय नक्की देतील, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूपेंद्र यादव यांची भेट घेणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मानव जातीसाठी पर्याय वाचवावा लागेल असेही त्यांनी सांगितले. 


पोरं ऊस तोडायला जातात हे विदारक चित्र बदलण्याची गरज


पंकजा यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांची पोरं ऊस तोडायला जातात हे विदारक चित्र बदलण्याची गरज आहे. बारामतीमध्ये मुलाचा खून, पुण्यात मुळशी पॅटर्न अद्याप सुरू आहे कोयता गँग अॅक्टिव्ह आहे यामध्ये कोणतेही राजकारण न करता सामान्य माणसाला न्याय देता येईल अशी भूमिका आम्हाला घ्यायची असल्याचे असल्याचे त्यांनी सांगितले. मजूर आणि ऊसतोड कामगारांचे उद्धार करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले. 


साखरशाळांवर पंकजा म्हणाल्या....


पंकजा मुंडे यांनी सांगितले की, यासंदर्भात मी अद्याप आढावा घेतला नाही. मात्र, ऊसतोड कामगारां सोबत त्यांची मुल जात नाहीत गावातच राहतात. त्यांची तिथं राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. मी मराठवाड्यात झालेल्या सर्वेक्षण अद्याप पाहिलेला नाही ते कितपत खरं आहे हे मी पाहिलेलं नाही. सरकारी शाळांचं शिक्षण सुधारण्यासाठी त्यांच्या खात्याकडून योगदान झालं तर चांगलं होईल. शिक्षण पद्धतीमध्ये आणखी बदल करण्यात येतील. 


इतर महत्वाच्या बातम्या