बारामती, पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीसंदर्भात  (Baramati Lok Sabha Constituency) माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी उमेदवारीचे संकेत दिले होते. याच अनुषंगाने पुरंदर आणि हवेली मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आ०ज सकाळी 11 वाजता सासवड येथे होणार आहे. या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


दोन दिवसापूर्वी महिला मेळाव्यात बोलताना विजय शिवतारे यांनी पवारांना पाडा अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यानंतर काल पवारांविरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं विजय शिवतारे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर उद्या सासवडमध्ये शिवतारे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. यामध्ये शिवतारे नक्की काय भूमिका घेतात हे पहाणं महत्त्वाचे असणार आहे.


पवारांच्या विरोधात विजय शिवतारे मैदानात उतरण्याची शक्यता


विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक जाहीर केलं होतं. त्यामुळे ही बैठक बोलवण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वी विजय शिवतारेंनी पुरंदरमध्ये मेळावा घेतला होता आणि या मेळाव्यात त्यांनी बारामतीचा सातबारा कोणत्याही पवारांकडे नाही, असं विधान करत शरद पवार आणि अजित पवारांना विरोध केला होता. एकीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या बारामतीच्या मैदानात आमोरासमोर लढणार असल्याच्या चर्चांना जोर धरत असताना विजय शिवतारेंनी आपली भूमिका जाहीर केली आहे. पवारांच्या विरोधात विजय शिवतारे हे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. 


2019 मध्ये अजित पवारांनी सांगून पाडलं त्यानंतर...


अजित पवार महायुतीत सामील व्हायच्या आधीपासून विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेसाठी तयारी सुरु केली होती. पक्षाने संधी दिली तर बारामती लोकसभा लढणार, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतर अजित पवार हे महायुतीत सामील झाले त्यानंतर विजय शिवतारेंचे दौरे थांबले होते. त्यावेळी अजित पवारांचं महायुतीत स्वागतदेखील केलं होतं. त्यानंतर त्यांनी बऱ्याट कार्यक्रमात त्यांनी अजित पवारांचं कौतुक केलं मात्र अचानकपणे विजय शिवतारेंनी अजित पवारांना विरोध करायला सुरुवात केली आहे. 2019 मध्ये अजित पवारांनी विजय शिवतारेंना सांगून पाडलं होतं. त्यामुळे त्यांच्यात वितुष्ट निर्माण झालं होतं. मात्र त्यानंतर महायुतील अजित पवार आले आणि शिवतारेंनी आलबेट असल्याचं दाखवलं होतं. आता मात्र बदला घेण्याची भाषा विजय शिवतारे करताना दिसत आहे.


इतर महत्वाची बातमी-


Sunetra Pawar: तुमची साथ असेल तरच मोठं पाऊल उचलेन, बारामती लोकसभेबाबत सुनेत्रा पवारांचं सूचक वक्तव्य