Vidharbha Unseasonal Rain Update : जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आजपासून देशात सुरुवात झाली आहे. तर राज्यात या लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) रणधुमाळीचा नारळ आज पूर्व विदर्भातील (Vidharbha) पाच मतदारसंघात फुटला आहे. एकीकडे विदर्भात उष्णतेची (Heat Wave) पाऱ्याचा जोर वाढत असताना मतदानाचा जोर देखील वाढताना दिसतोय. राज्यसह विदर्भात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलांडली असताना आता पुन्हा विदर्भात अवकळी ढग दाटणार आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) इशारा नागपूर प्रादेशिक हवामान (IMD) विभागाने दिला आहे. आधीच मागे पडून गेलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने  शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असताना आता परत अवकळी पावसाचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.  


पुढील पाच दिवस पावसाचे    


पूर्व विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये आज 19 एप्रिलला अवकळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर आगामी काळात पूर्व विदर्भातील बहुतांश भागात तुरळक ते माध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांच्या कडकड, 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य पावसाचा इशारा लक्षात घेता योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. एकीकडे राज्यात उष्णतेच्या पाऱ्याने चाळीशी ओलाडली असताना दुसरीकडे मात्र पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने, ऐन उन्हाळ्यात पावसाळा अनुभवायला मिळतो आहे. आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे अवकळी पावसाने मोठे नुकसान केले असताना आता परत अवकाळी पावसाने आणखी संकटाचे ढग गडत होतानाचे चित्र आहे.


विदर्भात अकोला सर्वाधिक हॉट  


विदर्भात आज सर्वाधिक तापमान अकोला जिल्ह्यात नोंदविण्यात आले आहे. अकोल्यात आज कमाल तपामन 43.3 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. त्या खालोखाल चंद्रपूर येथे 43.2 इतके तर अमरावती, यवतमाळ येथे  42 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले आहे. एकुणात अशीच काहीशी स्थिथी उर्वरित विदर्भातली आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा मोठा फटका बसतानाचे चित्र आहे


या राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा


दरम्यान, काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं 21 एप्रिलपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं या राज्यातील नागरिकांनी खबदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीन करण्यात आलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या