India Weather News : देशातील वातावरणात सतत बदल (Climate Chnage) होत आहे. कुठं उन्हाचा तडाखा जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पाऊस (Rain) कोसळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही देशातील काही भागात अवकाळी पावसासह हिमवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. तर दिल्लीतील नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. जाणून घेऊयात देशातील हवामान कसं राहणार याबद्दलची माहिती. 


'या' राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 21 एप्रिलपर्यंत देशातील झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राजस्थानमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. 


या राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा


दरम्यान, काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. हवामान विभागानं 21 एप्रिलपर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं या राज्यातील नागरिकांनी खबदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीन करण्यात आलं आहे. 


 दिल्लीतील तापमानात घट 


दिल्लीतही उन्हाचा तडाखा जाणवत होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून दिल्लीतील तापमानात घट झालीय. उष्णता कमी झाल्यानं दिल्लीकरांना दिलीसा मिळाला आहे. दिल्लीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दिल्लीसह उत्तर भारतात जोरदार वारे वाहतील, त्यामुळं उष्णता कमी होईल. 


महाराष्ट्रातही अवकाळी पावसाचा इशारा 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, 20 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा (Unseasonal rain) जोर कायम राहणार आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबदारी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 20 एप्रिल पर्यंत राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


सावधान! देशातील 'या' भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, खबरदारी घेण्याचं आवाहन, कुठं कसं असेल हवामान?