Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकांची (Lok Sabha Election Result 2024) रणधुमाळी संपताच आता साऱ्यांना  विधानसभा निवडणुकांचे (Election 2024) वेध लागले आहे. अशातच जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडीनेही आपली कंबर कसली आहे. दरम्यान काँग्रेसने (Congress) आज आसूड मोर्च्याचे आयोजन केलं असून या मोर्च्यातून सत्ताधारी महायुतीला विविध मुद्द्यावरून घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.


अशातच संविधानाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही कारभार केला नाही. अमित शहा यांनी सर्व खोटे नरेठीव सेट केले आणि खोट्या नरेंटिव्हचे मास्टरमाइंड अमित शहा आणि भाजपच असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. सोबतच सध्या राज्यात काँग्रेसच्या बाजूला जास्त मत आहेत, पण काँग्रेस कोणताही मीपणा करणार नाही. आम्ही सर्व पूर्ण ताकदीने आणि एकदिलाने महाविकास आघाडीला सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. परिणामी मुख्यमंत्रीपदासाठी महाविकास आघाडी हाच खरा चेहरा असल्याचे सुतोवाच देखील नाना पटोले यांनी केला आहे. ते रत्नागिरी येथे बोलत होते. 


खोट्या नरेंटिव्हचे मास्टरमाइंड अमित शहा आणि भाजपच- नाना पटोले 


महाराष्ट्राला विकण्याचं काम सध्या सरकार करत आहे. त्यामुळेच आम्ही काँग्रेसचा आसूड मोर्चा आयोजित केला आहे. सत्तेत आल्यानंतर देखील भाजप पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या प्रचारात असते. भाजप हे प्रचारक त्यामध्ये काही विशेष नाही. महाराष्ट्रमध्ये किती प्रॉपर्टी अजून विकायचे आहेत हे पाहण्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी महाराष्ट्रमध्ये सतत येतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही कारभार केला नाही. अमित शहा यांनी सर्व खोटे नरेटिव सेट केले आणि खोट्या नरेंटिव्हचे मास्टरमाइंड अमित शहा आणि भाजपच आहेत.  


महाराष्ट्राला विकण्याचं काम हे सरकार करत आहे. सर्व कंट्रोल गुजरातचा आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना सतत दिल्लीत जावे लागत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या होणाऱ्या दिल्ली दौऱ्याबाबत नाना पटोले यांनी ही टीका केलीय. सोबतच महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू असून यापुढे काय काय होत ते पहा, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.


महाराष्ट्राला विकण्याचं सध्याच्या सरकारचं काम   


भाजप आणि महायुती सरकारने वाघनखांबाबत देखील खोटा प्रचार केलाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्यापही उभे राहिले नाही. या सर्व पिलावळला सत्तेतून बाहेर काढणं हाच आमचा उद्देश असल्याचेही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे जागावाटप ऑगस्टमध्ये होईल आणि सप्टेंबर मध्ये उमेदवार देखील जाहीर होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचे बघायला मिळाले. परिणामी काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या विषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय कारवाई केली ते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगबाबत नाना पटोले यांनी हे विधान केलं आहे.


हे ही वाचा