Nagpur News :  राज्य शासनाकडून पशु वैद्यकीय (Veterinary) आणि मत्स विद्यपीठासाठी नवा सुधारित कायदा मंजूर करण्यात आला आहे. त्याला राज्यातील सहा शासकीय पशु वैद्यकीय आणि मत्स विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी (Student) विरोध केला आहे. या विद्यार्थ्यांनी या कायद्याला विरोध करत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. नागपुरात  विद्यार्थ्यांनी विद्यापीठ आणि  महाविद्यालयाच्या दाराला कुलुप लावले आहे.. तसेच कोणत्याही कर्मचाऱ्याला महाविद्यालयामध्ये विद्यार्थी जाऊ न देण्याचा आक्रमक पवित्रा या विद्यार्थ्यांनी केला आहे. राज्यातील नागपूर, उदगीर, मुंबई, परभणी आणि शिरवळ येथील पशु वैद्यकीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुधारित कायद्याविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 


काय आहे नवीन सुधारित कायदा?


सध्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करता येत आहे. म्हणजे विद्यार्थी दहावीनंतर दोन वर्ष पदविकाचा अभ्यासक्रम पूर्ण करुन पशु वैद्यकीय या क्षेत्रात काम करु शकतात. पण त्यांना जर या क्षेत्रात पदवी घ्यायची असेल तर त्यांना पुढील साडेपाच वर्ष व्यतित करावी लागतात. त्यानंतर हे विद्यार्थी पशु वैद्य म्हणून पात्र होतात. परंतु सुधारित कायद्यानुसार आता या विद्यार्थ्यांना दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता नाही येणार. त्यांना पशु वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदविकासाठी बारावीनंतरच प्रवेश घेता येणार आहे. त्यामुळे त्यांच्या पदविकाचा अभ्यासक्रम हा बारावीनंतर तीन वर्षांचा करण्यात आला आहे. त्यानंतर विद्यार्थी हे पदवीचे साडेपाच वर्षांचे शिक्षण घेऊ शकतील. त्यामुळे पदविका करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या कायद्याला विरोध आहे. 


विद्यार्थ्यांचा का आहे सुधारित कायद्याला विरोध


पदवी शिक्षणापेक्षा पदविकाचे शिक्षण हे कमी खर्चात होऊ शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा प्रामुख्याने पदविका अभ्यासक्रमासाठी कौल असतो. बारावीनंतर पदवीसाठी साडेपाच वर्ष देण्यापेक्षा विद्यार्थी पदविकाचा अभ्यासक्रम करणं निवडतात. पण नव्या शिक्षण कायद्यानुसार आता पदविकाचा अभ्यासक्रम देखील पाच वर्षांचा करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो अभ्याक्रम दोन वर्षात पूर्ण होत होता त्यासाठी आता विद्यार्थ्यांना पाच वर्ष द्यावी लागणार आहेत. म्हणून पदविका करणाऱ्या विद्यार्थ्यांचा या कायद्याला विरोध आहे. तर पदविका विद्यार्थ्यांचा तीन वर्षांचा अभ्यासक्रम केल्याने त्यांचे बऱ्यापैकी शिक्षण हे पदविकामध्ये होऊ शकते. त्यामुळे पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा या नव्या पदविका कायद्यासाठी विरोध आहे. 


विद्यार्थ्यांचा खासगीकरणाला विरोध


दरम्यान या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांच्या खासगीकरणाला देखील विरोध करण्यात येत आहे. सध्या राज्यात पाच शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालयं आहेत. नागपूर, उदगीर, मुंबई, परभणी आणि शिरवळ याठिकाणी ही महाविद्यालयं आहेत. पण या व्यतिरिक्त तीन आणखी महाविद्यालयांची तरतूद राज्य शासनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच एकूण आठ पशु वैद्यकीय महाविद्यालयं होणार आहेत.


या व्यतिरिक्त खासगी महाविद्यालयं करण्याला देखील शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालयं असताना खासगी महाविद्यालयांची तरतूद का असा सवाल विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पशु महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आता राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या या मागणींचा गांभीर्याने विचार केला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Crop Insurance : पीक विम्याचा हप्ता भरण्यासाठी केंद्राकडून तीन दिवसांची मुदतवाढ; 3 ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येणार