एक्स्प्लोर

वंचित बहुजन आघाडीमध्ये संघ आणि भाजपची घुसखोरी, वंचितचे नेते लक्ष्मण मानेंचा आरोप

लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये विधानसभेच्या तोंडावर उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पुणे : लोकसभा निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधलेल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये विधानसभेच्या तोंडावर उभी फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा पक्ष राहिला नसून, त्यात भाजप आणि संघाचे लोक घुसल्याचा आरोप वंचितचे नेते लक्ष्मण माने यांनी केला आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांची कार्यपद्धती चुकीची असल्याचे सांगत, संघाच्या लोकांना पक्षात प्रवेश देणाऱ्या आंबेडकरांनी राजीनामा देण्याची मागणीही माने यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकरांवर विश्वास नसल्याचेही माने यांनी कबूल केले आहे. भाजप शिवसेना युतीला लोकसभा निवडणुकीत आपल्यामुळे (वंचित आघाडीमुळे) 10 जागा अधिकच्या मिळाल्याचा गौप्यस्फोटही लक्ष्मण माने यांनी केला आहे. एबीपी माझाशी बोलताना माने यांनी थेट वंचितचे महासचिव गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित असलेला व्यक्ती आंबेडकरवादी पक्षात कसा असू शकतो? असा सवालही माने यांनी उपस्थित केला आहे. पाहा काय म्हणाले आहेत लक्ष्मण माने माने यांनी दावा केला आहे की, गोपीचंद पडळकर संघाचे कार्यकर्ते होते. त्यांच्या हातात आजही संघाचा धागा बांधलेला आहे. संघाच्या गणवेशातील पडळकरांचे फोटो व्हायरल झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. तसेच पडळकर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या संपर्कात असतात. याप्रकरणी वंचितचे महासचिव गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचित केली असता, लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा पलटवार पडळकर यांनी केला आहे. शिवाय पडळकर यांनी माध्यमांऐवजी पक्ष कार्यकारिणीसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याचा सल्लाही माने यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका
उद्धव ठाकरेंचं नागपुरात रामरक्षा आंदोलन; संजय राऊत पोहोचले, म्हणाले, देवेंद्र फडणवीसांनाही निमंत्रण, शिंदेंवर टीका

व्हिडीओ

Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : 'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
'विहानचा जीव नेमका कुणामुळे गेला?' चेंबूर दुर्घटनेवरून भाजप नेते अमित साटम यांचा BMC वर थेट हल्लाबोल!
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
तुकाराम मुंढेंचा धडाका कायम! मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सवर कारवाई, अस्वच्छतेमुळे जागेवरच परवाना रद्द
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! जंयत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल, सुनील तटकरेंसह प्रफुल्ल पटेलही उपस्थित, राजकीय घडामोडींना वेग
IND vs ENG : कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप, शुभमन गिल, श्रेयस अय्यरनं किल्ला लढवला
कोट्यवधी चाहत्यांची निराशा, इंग्लंडमध्ये पहिल्या वनडेत विराट कोहली, रोहित शर्मा फ्लॉप
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
बांधकाम कामगारांना सुधारित कल्याणकारी योजना लागू; निवृत्ती वेतनही मिळणार, मुलांच्या शिक्षणासाठी 60 हजार
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण

Embed widget