एक्स्प्लोर

भाजपमध्ये प्रवेश करतोय मात्र शरद पवारांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही : वैभव पिचड

पिचड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला 32 हजाराचं मताधिक्य दिलं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकास कामाला खिळ बसली.

शिर्डी : आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला. खांद्याला खांदा लावून काम केलं. मात्र मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षात करणार प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार वैभव पिचड यांनी केली. अकोले येथे कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पिचड म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत अकोले मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला 32 हजाराचं मताधिक्य दिलं. विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करताना विकास कामाला खिळ बसली. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे आपणच सत्ताधारी पक्षात जावं ही जनतेची मागणी आहे. शरद पवारांचे उपकार मी कधीही फेडू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले. पुन्हा आघाडीची सत्ता येणार नाही अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत असणं गरजेचं आहे. हा निर्णय घेणं खूप अवघड होतं. जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे, असेही ते म्हणाले. आजवर राष्ट्रवादीच्या सदस्यांनी दिलेला सन्मान कधीही विसरू शकणार नाही. विकासाची गंगा मतदारसंघात आणण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश करून शरद पवार आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या चित्रा वाघ आणि वैभव पिचड 30 जुलैला भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या तीन दिवसात चित्रा वाघ आणि वैभव पिचड यांनी भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती देखील सुत्रांकडून मिळाली आहे. याशिवाय काँग्रेसमधून कालिदास कोळंबकर, सुनील केदार, जयकुमार गोरे, गोपालदास अग्रवाल हे देखील भाजप प्रवेशासाठी रांगेत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. वैभव पिचड अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. या भेटीदरम्यान राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते. मधुकर पिचड राष्ट्रवादीच्या संस्थापक नेत्यांपैकी एक असल्याने हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.  आमदार वैभव पिचड यांच्या भाजपा प्रवेशाच्या हालचालींना वेगाने सुरुवात झाली असून  अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
दोन वर्षांपूर्वी लग्न, 2 जुळ्या मुली; ठाण्यातील मृत TDRF जवानाच्या कुटुंबीयांचा आक्रोश, ठाणे महापौरांकडून आश्वासन
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget