एक्स्प्लोर

राज्यात इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त, फार्मसीकडे कल

गेल्या चार ते पाच वर्षात इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली.

मुंबई : मुलाला मोठा इंजिनिअर करण्याचं स्वप्न बाळगून पालकांनी आपल्या पाल्यांना इंजिनिअरिंगमध्ये 'टाकायला' सुरुवात केली. मधल्या काळात या विद्यार्थ्यांचा आकडा बराच वाढला होता. पालकवर्गाच्या वाढत्या उत्साहामुळे महाविद्यालयंही पत्त्यांसारखी उभी राहिली. मात्र आता हा उत्साह ओसरलेला दिसत असल्याने इंजिनिअरिंगच्या जागाही रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयांची चांगलीच अडचण झाली आहे. 2016 - इंजिनियरिंगच्या 43 टक्के जागा रिक्त 2017- इंजिनियरिंगच्या 44 टक्के जागा रिक्त 2018- इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त ही घसरगुंडी महाराष्ट्रातल्या इंजिनियरिंग महाविद्यालयांची आहे. गेल्या चार ते पाच वर्षात राज्यात कुत्र्यांच्या छत्र्यांसारखी कॉलेजेस उगवली. विद्यार्थ्यांना इंजिनियरिंगची स्वप्नं दाखवली गेली. पण इंजिनियरिंगकडे वाढलेला ओढा आता आटला आणि अनेक महाविद्यालये बंद करण्याची वेळ आली. महाराष्ट्रात सध्या 360 इंजिनियरिंग कॉलेज आहेत, तर 447 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत. 2017 साली एक लाख 44 हजार जागांपैकी 64 हजार 625 जागा रिक्त राहिल्या, तर 2018 साली एक लाख 38 हजार जागांपैकी 56 हजार जागा रिक्त राहिल्या. दरम्यान, फार्मसी म्हणजेच औषधनिर्माणशास्त्राकडे विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचं दिसत आहे. इंजिनियरिंगमधील घसरणीचं मूळ हे कॉलेजच्या बाहेर आहे, कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर मिळणाऱ्या अपुऱ्या संधींमध्ये आहे. पण या स्थितीवर सरकारने तूर्तास काही उपाययोजना आखलेल्या आहेत नव्याने सुरु होणाऱ्या इंजिनियरिंग आणि पॉलिटेक्निक महाविद्यालयांना स्थगिती देण्याची विनंती एआयसीटीईला करण्यात आली आहे. ज्या खाजगी संस्थांनी इंजिनियरिंग कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी अभ्यासक्रमात बदल करुन प्रात्यक्षिकांवर भर देऊन व्यवसायाभिमुख शिक्षणाला भर दिला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
महाराष्ट्र हीच देवेंद्रजींची कर्मभूमी, ते इथं चांगल काम करतायेत, दिल्लीत जाण्याच्या चर्चांवर अमृता फडणवीसांचं वक्तव्य 
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! शहरातील पाणीकपात पूर्णपणे रद्द, पाणीपुरवठा करणारे सर्व धरणे 100 टक्के, पालिका आयुक्तांची माहिती
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 
ऐन सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात वाढ, सामान्य नागरिकांच्या खिशाला बसणार झळ, नेमका किती आहे दर? 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Embed widget