एक्स्प्लोर

ब्राह्मोसची माहिती पाकला दिल्याचा आरोप, नागपुरातून इंजिनीअरला अटक

निशांत अग्रवाल मॅकेनिकल इंजिनीअर असून शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे

नागपूर : देशाची सुरक्षा भेदण्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक केली आहे. उत्तर प्रदेश एटीएस आणि लष्कराने ही कारवाई केली असून निशांत अग्रवाल असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. निशांत ब्राह्मोस क्षेपणास्त्राच्या प्रोजेक्टमध्ये इंजिनीअर आहे. सुरक्षे संदर्भातील गोपनीय माहिती पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयला दिल्याचा निशांतवर आरोप आहे.

निशांत भारताच्या सुरक्षेची ताकद असलेल्या ब्राम्होस मिसाईलशी संबधित माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेला देत असल्याची माहिती समोर येत आहे. निशांत डीआरडीओच्या ब्राम्होस युनिटमध्ये कार्यरत असल्याने रिसर्च विंगची बरीच गुप्त माहिती त्याच्याकडे होती.

निशांत उत्तराखंडचा रहिवाशी आहे आणि गेल्या चार वर्षांपासून तो नागपूरच्या युनिटमध्ये कार्यरत आहे.

कोण आहे निशांत अग्रवाल?

- निशांत अग्रवाल हा मूळचा उत्तराखंडच्या रुरकीचा आहे - निशांत मॅकेनिकल इंजिनीअर असून डीआरडीओच्या क्षेपणास्त्र युनिटमध्ये शास्त्रज्ञ पदावर कार्यरत आहे - डोंगरगाव येथील प्लांटमध्ये तो कार्यरत आहे - नागपुरच्या उज्ज्वल नगर परिसरातील मनोहर काळे यांच्या घरात निशांत गेल्या चार वर्षांपासून राहत आहे - यावर्षी मार्च महिन्यात निशांतचा विवाह झाला आहे.

ब्राम्होस वैशिष्ट्य

- ब्राह्मोस हे भारत आणि रशियाच्या संयुक्त संशोधनातून तयार झालेले मिसाईल आहे - कमी अंतरापर्यंत वार करणारं हे मिसाईल, जमीन, विमान, जहाज आणि पाणबुडीत वापरले जाते - हवेतच मार्ग बदलणे आणि चालत्या लक्ष्यालाही उद्ध्वस्त करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे - लष्कर, वायूदल आणि नौदल या तिन्ही सुरक्षा यंत्रणांसाठी ब्राह्मोस उपयुक्त आहे - अवघ्या 10 मिटरच्या उंचीवरुन उडण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे - शिवाय ब्राह्मोस मिसाईल रडारवरही पकडले जाऊ शकत नाही - ब्राह्मोसला पकडणं किंवा उद्ध्वस्त करणं कठीणच नव्हे अशक्य आहे - ब्रोह्मोस मिसाईल अमेरिकन टॉमहॉक मिसाईलच्या दुप्पट वेगाने वार करते

महत्त्वाच्या बातम्या

MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
नाशिककरांसाठी पुढचे चार ते पाच तास महत्वाचे, 500 मिलीमीटर पाऊस पडण्याचा इशारा, NDRF च्या टीम तैनात
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ

व्हिडीओ

Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
ह्रदयद्रावक... भिवंडी दुर्घटनेत दोन सख्ख्या भावासह एकाच गावातील चौघांचा मृत्यू; मृतदेह गावी कसे न्यायचे, जवळ नाहीत पैसे
Embed widget