तळकोकणात अवकाळी पावसाची काल दमदार हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाली. आंबोली, चौकूळसह सह्याद्रीच्या पट्यात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. दोडामार्ग, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातील ग्रामीण भागातही अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक भागात विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे.
कोकणासह बेळगाव आणि सीमाभागात पहिल्याच वळीवाने घराघरात पाणी शिरले. अनेक ठिकाणी शेतीचं काही प्रमाणात नुकसान झालं.
सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली. वातावरणात अचानक बदल होत अवकाळीच्या सरी सांगलीत बरसल्या. ढगाळ वातावरणासह तासगाव, मिरज तालुक्यात रिमझिम पाऊस बरसला.
साताऱ्यातही महाबळेश्वर आणि वाई परिसरात पावसाने हजेरी लावली. काल दुपारी भर उन्हात पावसाच्या सरी बरसल्या.
मराठवाड्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यातील नेकनूर आणि मांजरसुंबा येथे अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.
सोलापूरमध्येही ढगांच्या गडगडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली.