1. नागपूरमध्ये निवडणूक पथकाकडून 25 लाख रुपये जप्त तर अमरावतीमध्ये सव्वातीन लाखांची रोकड ताब्यात, पोलिसांची कारवाई
  1. पाकिस्तानने आपल्या देशातले 40 अतिरेकी मारले, रावसाहेब दानवेंचं शहीदांबाबत वादग्रस्त वक्तव्य, विरोधकांकडून क्लिप व्हायरल
  1. हिंमत असेल तर धनंजय मुंडेंनी लोकसभा लढवावी, बीडच्या प्रचारसभेत पंकजा मुंडेंचं आव्हान
  1. संजय निरुपम यांना मुंबई उत्तर-पश्चिममधून उमेदवारी, मात्र मुंबई काँग्रेस अध्यक्षपद गेलं, मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
  1. वादग्रस्त जागा स्वाभिमानीच्या गळ्यात मारू नका, सांगली लोकसभेच्या जागेवरुन राजू शेट्टींची काँग्रेस हायकमांडकडे विनंती
  1. प्राध्यापक भरती प्रक्रिया सरकारी अधिकाऱ्यांमुळे रखडली, शिक्षणमंत्री विनोद तावडेंचा आरोप
  1. सत्तेत आल्यास गरिब कुटुंबांना वर्षाला 72 हजाराचं उत्पन्न मिळवून देऊ, लोकसभेच्या तोंडावर राहुल गांधींकडून गरिबी हटाओचा नारा, तर योजना फसवी असल्याची भाजपची टीका
  1. खाजगी शाळांतील शिक्षकांपाठोपाठ मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांनाही दिलासा, 'इलेक्शन ड्युटी' सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीच
  1. शत्रूशी दोन हात करण्यासाठी चिनूक हेलिकॉप्टर्स देशसेवेत दाखल, भारताची ताकद वाढवण्यात चिनूक गेम चेंजर ठरणार, हवाईदल प्रमुखांचा विश्वास
  1. किंग्स इलेव्हन पंजाबकडून राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव, सलामीवीर गेलचा आयपीएलमध्ये 4 हजार धावांचा टप्पा पार