गडचिरोली : वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी या वर्षात गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याच बरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. आज एकुण 27 लाख रुपये बक्षीस असलेल्या एकुण पाच जहाल नक्षलवादयांनी गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकदडे यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये दोन पुरूष आणि तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे.
1. अजय उर्फ मनेसिंग फागूराम कुळयामि हा माओवादी आहे. एप्रील 2007 मध्ये टिपाड दलम सदस्य पदावर भरती होऊन जुलै 2016 पासून ते आजापर्यंत प्लॅटून क्रमांक तीन मध्ये उपकमांडर पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे 19 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये खुनाचे 12 आणि जाळपोळीचे 5 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारने त्याच्यावर एकूण पाच लाख पन्नास हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
2. राजो उर्फ गंगा उफ शकिकला सोमजी तुलावी ही 26 वर्षाची माओवादी असून ती सन 2008 मध्ये टिपागड दलम मध्ये सदस्य म्हणून भरती झाले. जुलै 2015 पासून ते आजपर्यंत ती प्लॉटून क्र. 3 मध्ये सदस्यपदी कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे 8, खुनाचे 2 आणि जाळपोळीचे 2 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुलावीवर शासनाने एकूण पाच लाख रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
3. सपना उर्फ रूखमा दोनू वड्डे ही वय 27 वर्षाची जहाल माओवादी असून आक्टोंबर 2006 मध्ये चातगाव दलमच्या सदस्य पदावर भरती झाली. डिसेंबर 2011 पर्यंत धानोरा दलममध्ये कार्यरत होती. त्यानंतर जानेवारी 2012 पासून ती आजपर्यंत प्लॉटून क्र. 95 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर एकूण बारा दखल करण्यात आले आहे.
यामध्ये खुनाचे चार आणि जाळपोळीचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सरकारने तिच्या एकूण पाच लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.
4. गुब्नी उर्फ बेहरी उर्फ वसंती मनकेर मडावी ही 31 वर्षाची माओवादी असून डिसेंबर 2007 मध्ये टिपागड दलमच्या सदस्य पदावर भरती झाली. त्यानंतर 2013 मध्ये टिपागड दलमच्या पीयीसीएम पदावर पदोन्नती दिली. त्यानंतर ती 2015 पासून आजपर्यत कंपनी क्र. 10 व्या सदस्य पटावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शासनाने तिच्यावर एकूण पाच लाख बहात्तर हजार रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
5. सुनिल उर्फ फुलसिंग सुजान होळी वय 38 वर्षाचा माओवादी आहे. जुलै 2008 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती झाली. फेब्रुवारी 2013 पासून आजपर्यंत कंपनी क्र. दहाव्या सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे 12 गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये खुनाचे चार, जाळपोळीचे तीन आणि अपहरणाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शासनाने त्याच्यावर एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे आजपर्यंत एकूण 34 माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये तीन डिव्हीसी, दोन दलम कमांडर, दोन दलम उपकमांडर, 26 सदस्य, एक जनमिलीशिया यांचा समावेश आहे. तर 2005 साला पासून आजपर्यंत एकुण 638 माओवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. तर 22 माओवाद्यांना अटक करण्यात पोलीसांना यश मिळाले आहे. यामध्ये डी. के. एस. झेड., सी. मेंबर दोन, दलम कमांडर एक, सदस्य चार, पार्टी मेंबर दोन, समर्थक तेरा यांचा समावेश आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलास अभूतपूर्व यश, पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Dec 2019 08:33 PM (IST)
माओवादी मोठया संख्येने आत्मसमर्पण करीत आहेत. आज एकुण 27 लाख रुपये बक्षीस असलेल्या एकुण पाच जहाल नक्षलवादयांनी गडचिरोलीचे पोलीस अधिक्षक शैलेश बलकदडे यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये दोन पुरूष आणि तीन महिला माओवाद्यांचा समावेश आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -