एक्स्प्लोर

Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात अनलॉक सुरु, उद्यापासून अनेक निर्बंधात शिथिलता

बुलढाणा जिल्ह्यात उद्यापासून अनलॉकची प्रक्रिया सुरु होत असून नवीन नियम हे 20 मे ते 1 जून पर्यंत लागू असतील असं प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. 

बुलढाणा : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना ब्रेक द चेन अंतर्गत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यात 20 मे पासून अनलॉक प्रक्रिया सुरु करण्यात येत असून अनेक निर्बंधात शिथिलता आणण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी रामामुर्ती यांनी स्पष्ट केलंय. या संबंधी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे एक परिपत्रक काढण्यात आलं आहे. हे नवीन नियम 20 मे सकाळी 6 वाजल्यापासून ते 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू असतील. 

या नव्या नियमांनुसार, जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा मालाची दुकाने तसेच स्वस्त धान्यांची दुकाने सकाळी 7 ते 11 वाजायच्या दरम्यान सुरु राहतील. भाजीपाला आणि फळविक्रीही सकाळी 7 ते 11 वाजण्याच्या दरम्यान सुरु राहतील. दुध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री ही सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते रात्री 9 या दरम्यान सुरु राहणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठांची दुकाने, कृषी प्रक्रिया उद्योग, शेती अवजारे आणि शेतीतील उत्पादनांशी संबंधित दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. या बाबतचे नियोजन हे तालुका कृषी अधिकाऱ्यांनी करायचे आहे. 

सर्व राष्ट्रीयकृत बँका आणि बँकिंगशी संबंधित सर्व संस्था या सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील असं या आदेशात म्हटलं आहे. तर रेस्टॉरन्ट, भोजनालयं आणि उपहार गृहे ही केवळ होम डिलिव्हरीसाठी सुरु राहतील. त्यांची वेळ सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत अशी असेल. 

कृषी उत्पन्न बाजार समितीचे काम हे 23 मे पर्यंत बंद राहणार असून त्यानंतर टोकन पद्धतीने नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधक सहसंस्थांनी करायची आहे. 

उपरोक्त कालावधी शिवाय कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई आहे असा आदेश काढण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व उद्याने बंद असतील आणि मॉर्निंग वॉकला मनाई आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था या बंद राहतील अस स्पष्ट करण्यात आलं आहे. 

या काळात सार्वजिनक समारंभांवर बंदी असेल. लग्न संमारंभाचे आयोजन करायचे असेल तर ते घरघुती पद्धतीने करावं लागेल असं या आदेशात सांगण्यात आलं आहे. वरील नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 21 January 2024Sanjay Raut Full PC : ...तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देऊ, संजय राऊतांचं मोठं वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 21 January 2024Jayant Patil on Akshay Shinde | शाळा मालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, जयंत पाटलांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
नाशिकमध्ये कंटेनरनं ओव्हरटेक करताना रिक्षाला उडवलं; चार वर्षीय चिमुकलीसह तिघांचा मृत्यू
Zomato Share : झोमॅटोचा शेअर 8 टक्क्यांनी आपटला, तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला, ब्रोकरेज हाऊसनं दिलं नवं टार्गेट
झोमॅटोचा तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट आला अन् शेअर 8 टक्क्यांनी आपटला, गुंतवणूकदारांना ब्रोकरेज हाऊसनं कोणता सल्ला दिला?
US Exit From WHO : डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
डोनाल्ड ट्रम्प ऑन अॅक्शन मोड; अमेरिका WHO मधून बाहेर पडणार, निर्णयानं जगभरात खळबळ
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
डोनाल्ड ट्रम्प यांचा अवघ्या 24 तासांमध्ये सर्जिकल स्ट्राईक! लाखो भारतीयांचा स्वप्नांचा चक्काचूर, आजवरच्या 'शाॅर्टकट'वर एका झटक्यात आसूड ओढला
Crop Insurance : एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास , योजनेचा अंतिम निर्णय कुठं अन् कोण घेणार? कृषीमंत्री म्हणाले...
एक रुपयात पीक विमा योजनेतील गैरप्रकार निदर्शनास, दोघांवर कारवाई, कृषीमंत्री म्हणाले अंतिम निर्णय...
Sanjay Raut : पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
पालकमंत्रिपदाची दंगल आर्थिक व्यवहारासाठी, संजय राऊतांचा गंभीर आरोप; म्हणाले, नाशिक अन् रायगडमध्ये...
Beed: बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
बीडच्या आष्टी तालुक्यात धक्कादायक प्रकार, HIV झाल्याच्या अफवेने कुटुंबाला वाळीत टाकलं
Who is Neeraj Chopra wife Himani Mor : सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
सासऱ्यानं गावात स्टेडियम बांधलं, एकाच घरात तीन खेळ, मेव्हणा नागपुरात; नीरज चोप्राची बायको हिमानी आहे तरी कोण?
Embed widget