एक्स्प्लोर
सोलापुरात काळवीटावर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार
माढा तालुक्यातील अरण-पडसाळी रस्त्यावरील अरण हद्दीतील तात चरत असलेल्या काळवीटांच्या कळपावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.
![सोलापुरात काळवीटावर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार Unknown Person Firing On Blackbuck In Solapur Latest Updates सोलापुरात काळवीटावर अज्ञात व्यक्तीचा गोळीबार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/18204527/kalvit.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सोलापूर : माढा तालुक्यातील अरण-पडसाळी रस्त्यावरील अरण हद्दीतील शेतात चरत असलेल्या काळवीटांच्या कळपावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. या गोळीबारात कळपातील काळवीटाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली, अशी माहिती वनरक्षक बाबासाहेब लटके यांनी दिली.
एक तवेरा गाडी अरण-पडसाळी रस्त्यावरील टोणपे वस्तीजवळ आली आणि काळवीटांचा कळप बघून थांबली. गाडीतून चार-पाच जण होते. यापैकी एकाने गाडीतून उतरुन कळपाच्या दिशेने गोळीबार केला. आवाज आल्याने मी गाडीकडे निघालो परंतु अज्ञात व्यक्ती लगेच गाडीत बसून पसार झाले. त्यामुळे गाडीचा नंबर दिसला नाही, अशी माहिती शेतकरी बालाजी अजिनाथ टोणपे यांनी दिली.
वनपाल लटके यांनी घटना स्थळाचा पंचनामा केला आहे. शेतकरी टोणपे यांचा जबाब घेऊन मृत काळवीटाचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
प्रथम श्रेणी पशुवैद्यकीय अधिकारी शिंदे हे परगावी असल्याने उद्या सकाळी मृत काळवीटाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)