एक्स्प्लोर

नेवासा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी अनोखा पॅटर्न

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे शासकीय कोविड सेंटरमध्ये योगा, क्रिकेटसह विविध खेळ घेतले जात असल्याने कोरोना रुग्णांच मनोबल वाढवण्यासाठी मदत होत आहे.

नेवासा (अहमदनगर) : क्रिकेट स्पर्धा, बॅडमिंटन आणि रोज सकाळी योगा व प्राणायाम हे चित्र आहे, नेवासा तालुक्यातील कोव्हिड सेंटर मधील. कोरोना झाल्यावर अनेकजण घाबरतात व त्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते. यावर अनोखा उपाय शोधत नेवासा तालुक्यातील हा पॅटर्न आता राज्यासाठी दिशादर्शक ठरतोय.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे शासकीय कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांच्या मानसिक धैर्यासह शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी बॅडमिंटन क्रिकेट यासह इतर खेळ आणि प्राणायामचे धडे देऊन त्यांच्या मनातील दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नेवासा तालुक्यातील भेंडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये सध्या 300 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेक दात्यांचे मदतीचे हात या कोविड सेंटरच्या मदतीसाठी सरसावलेले आहे. 

कोविड रुग्णांची मनातील असलेली भीती दूर व्हावी तसेच योग प्राणायामद्वारे त्यांना आत्मिक बळ मिळण्यासाठी त्यांच्याकडून प्राणायाम करून घेतले जात असल्याने रुग्णांची मनातील धडकी दूर झालेली दिसत आहे. उपचार घेताना नवचैतन्य त्यांच्यात येण्यासाठी कोविड सेंटरच्या प्रांगणात कोविड रुग्णांना बॅडमिंटनसह क्रिकेट खेळण्यासाठी देण्यात आलेल्या क्रीडा साहित्यामुळे पुरुष देखील मनसोक्त क्रिकेट खेळत आनंद लुटताना दिसत आहे. महिलाही बॅडमिंटनसह पारंपरिक खेळ खेळून वेगळा आनंद लुटतांना दिसत आहेत. 

कोविड रुग्णांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी योग प्राणायाम तसेच विविध प्रकारचे खेळ, मन मोकळं करण्यासाठी राबविण्यात आलेले समुपदेशन सत्र असा हा आगळा वेगळा पॅटर्न कोविड रुग्णांसाठी ते बरे होण्यासाठी प्रभावी ठरत आहे. असे प्रयोग राज्यभर रावबिले गेल्यास रुग्णांच्या बरे होण्याच्या संख्येत भर पडेल हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑक्टोबर 2026 | शनिवार
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार! एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार! एका बाजूला उन्हाचा पारा वाढला, तर दुसऱ्या बाजूला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : या नाटकात फडणवीस, शिंदे अन् जरांगे मुख्य पात्रे; बाकी सगळे एक्स्ट्रा- संजय राऊत
Manoj Jarange PC : मला का संपवायचंय? आता त्यांना सोडत नाही : मनोज जरांगे
Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bengal Bay Cyclone : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे सावट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट; कुठे-कुठे हाहाकार माजणार?
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
श्रीकांत शिंदे म्हणाले, 500 कोटी हातातून, बॅगेतून नेता येत नाही; प्रसाद लाड यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
KBC Drought Story: केबीसीत लाखो जिंकला, पण दुष्काळात हरला; मराठवाड्यातील शेतकऱ्याची व्यथा, विहीर कोरडी,डोळ्यात पाणी
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक, ऊस दराबाबत तोडगा नाहीच; स्वाभिमानीचं आंदोलन सुरूच राहणार
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
बंदी घातलेल्या संघटनेशी संबंध, काश्मीरमध्ये 4 महिलांसह 6 जणांना अटक; हॉटेलमध्ये गुप्त बैठका, 7-8 लाख रुपयांच्या व्यवहारांचा संशय
FDA: आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
आम्हाला कारवाईपासून रोखलं जातंय, अधिकार हिरावले जातायत! तुकाराम मुंढेंच्या एफडीएची आरोग्य मंत्रालयाविरोधात कोर्टात धाव
Devendra Fadnavis: Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
Gen-Z, Gen-Alpha माहिती अन् तंत्रज्ञानाच्या स्फोटाच्या काळात जन्मलेले, पण..; विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीसांच मोठं वक्तव्य
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
बस थांबवली नाही तर हातात कोयता घेऊन रस्त्यावर उभे राहणार; मुंबईच्या कोळी महिलांचा संताप, बेस्टला इशारा
Embed widget