Ambernath Murder: अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात डीएमसी कंपनीच्या बाजूला वूलन मिल कंपाऊंड येथील एका अज्ञात तरूणाची हत्या करण्यात आलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. हत्या झालेल्या तरूणाची अद्याप ओळख पटलेली नसून स्थानिक पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत. 


अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागात डीएमसी कंपनीच्या बाजूला वूलन मिल कंपाउंडचं मोकळं मैदान आहे. या मैदानात आज सकाळच्या सुमारास स्थानिकांना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. या तरुणाच्या डोक्यात भलामोठा दगड घालून त्याची हत्या करण्यात आलीय. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. मृत तरुणाचं वय अंदाजे 25 ते 30 वर्षांचा असून त्याच्याजवळ ओळख पटण्यासारखं काहीही सापडलेलं नाही. तसेच या तरूणाची दोन जणांनी मिळून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांना संशय आहे.


या मृत तरुणाची ओळख पाठविण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू करण्यात आलंय. यासाठी स्थानिकांची मदत घेतली जात असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, अशी माहिती अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी दिली आहे.


मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात
मुंबई- पुणे एक्सप्रेस हायवेवर माडप बोगद्याजवळ आज भीषण अपघात झालाय. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर माडपनजीक कारला अपघात झालाय. या कारनं टँकरला मागून धडक दिलीय. या अपघात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करीत आहेत. 
 
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha