एक्स्प्लोर

उल्हासनगर महापौरपद निवडणूक, 'साई'विरोधात शिवसेनेची याचिका

उल्हासनगर : राज्यात 21 फेब्रुवारी रोजी झालेल्या दहा महापालिकांच्या निवडणुकांपैकी उल्हासनगर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक आज पार पडणार आहे. दुपारी दोन वाजता पालिका सभागृहात निवडणूक होणार असून यात शिवसेना आणि भाजपामध्ये कडवी झुंज होणार आहे. शिवसेनेने साई पक्षाच्या नोंदणीविरोधात थेट न्यायालयात याचिका दाखल केली असून निवडणुकीपूर्वी त्यावर सुनावणी होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंजकता निर्माण झाली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत भाजपाला टीम ओमी कलानीच्या सहाय्याने 33 जागा मिळाल्या असून बहुमताचा आकडा मात्र 39 आहे. त्यामुळे भाजपानं 11 जागा निवडून आणणारा साई पक्ष आणि दोन अपक्षांच्या साथीनं संख्याबळ 46 वर नेलं असून महापौरपदावर दावा केला आहे.

उल्हासनगर महापौर निवडीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का

भाजपने उल्हासनगरच्या महापौरपदासाठी जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांच्या पत्नी मीना आयलानी आणि उपमहापौरपदासाठी साई पक्षाचे सर्वेसर्वा जीवन इदनानी यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे या निवडणुकीत 25 नगरसेवक निवडून आले असून राष्ट्रवादीच्या चार, रिपाइंच्या दोन आणि काँग्रेसच्या एका नगरसेविकेने विकासाच्या मुद्द्यावर शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शिवसेनेचं संख्याबळ 32 वर गेलं असून आणखी सात नगरसेवकांची बहुमतासाठी गरज पडणार आहे. शिवसेनेनं महापौरपदासाठी ज्योती माने आणि उपमहापौरपदासाठी रिपाइंच्या भगवान भालेराव यांचा अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत भाजपसाठी किंगमेकर ठरलेल्या साई पक्षाने कोकण विभागीय आयुक्तांकडे आपली गटनोंदणी करताना पक्षाची घटना न लावल्यानं कोकण आयुक्तांनी साई पक्षाची आपल्याकडे महापालिकेतील पक्ष म्हणून नोंदच नसल्याचं पालिका प्रशासनाला कळवलं होतं. त्यानंतर साई पक्षाने आपली घटना सादर केली आणि कोकण आयुक्तांनी आपला निर्णय बदलला. मात्र निर्णय बदलणं गैर असल्याचा आरोप करत शिवसेनेनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दोन वाजण्यापूर्वी सुनावणी होणं अपेक्षित असून निकाल साई पक्षाच्या विरोधात गेल्यास त्यांचे सर्व नगरसेवक अपक्ष ठरु शकतात. यानंतर फोडाफोडीचं राजकारण करुन शिवसेना आपली सात जागांची गरज सहज भागवू शकते.

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian Case: मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोहोचले, म्हणाले, 'मला कोणीच कंट्रोल करु शकत नाही फक्त देव...'
Dattatray Bharne Farmers: कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
कृषीमंत्र्यांचा ताफा अडवला, बशीत सुकामेवा भरून दिला, शेतकरी संतापून दत्तात्रय भरणेंना म्हणाले, 'बैठकीत बसून काजू बदाम खाऊ नका ठोस उत्तर द्या...'
Nashik Crime News: आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना
आई-वडिलांच्या अंथरुणातून 8 महिन्यांची चिमुरडी गायब, पोलिसांच्या चौकशीनंतर संशयिताने टोकाचे पाऊल उचलले अन्...; नाशिकमधील खळबळजनक घटना
Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई
Maharashtra Live blog updates: रिझर्व्ह बँकेकडून थेट सहकार मंत्र्यांवरच नियमभंगाची कारवाई

व्हिडीओ

Sangli krishna river : दूषित पाणी थेट नदीत, कृष्णेचा रंग बदलला Special Report
Mumbai IIT Students Protest : विद्यार्थ्याचा मृत्यू, कॅम्पस हादरला; IIT बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन
Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepanshu Shokeen : NSUI नं उमेदवारी मागं घ्यायला लावली, अपक्ष लढून अनवाणी फिरत प्रचार केला, अभाविपसह सर्वांच्या उमेदवारांना पराभूत केलं, DUSU चा नवा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन नेमका कोण?
वडील कंडक्टर आई अंगणवाडी सेविका, DUSU चा उपाध्यक्ष दीपांशू शौकीन ठरला जायंट किलर...
Rahul Gandhi: 'सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
सिस्टीमला विद्यार्थी नकोत अंधभक्त हवेत' राहुल गांधी यांचा इंदूरच्या छात्रों की गूंजमधून हल्लाबोल 
LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 सप्टेंबर 2026 | शनिवार
DUSU Election Result : दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला, NSUI चा पराभव, उपाध्यक्षपदी अपक्षानं मारली बाजी 
दिल्ली विद्यापीठातं ABVP नं अध्यक्षपदासह तीन पदावंर विजय मिळवला,उपाध्यक्षपदावर अपक्ष उमेदवाराचा विजय
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
माजी केंद्रीय मंत्र्यांसह भाजप कार्यकर्त्यांनी पंजाब मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अंडी टोमॅटो फेकली; दारुची बाटली दाखवत म्हणाले..
Pune Crime News : आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
आधी मामाचा गळा चिरला; नंतर स्वतःही जीवन संपवलं, शेवटच्या नोटमध्ये लिहलं कारण, पुण्यात मामा-भाच्याचा दुर्दैवी अंत
Varun Sardesai : आदित्य ठाकरेंवर आरोप करणाऱ्यांकडे एकजरी पुरावा असेल तर दाखवावा, मग बोलावं, वरुण सरदेसाईंनी सर्व आरोप फेटाळले
आदित्य ठाकरे सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियनला भेटले नव्हते, ओळखत नव्हते : वरुण सरदेसाई
Embed widget