एक्स्प्लोर

आईला लेकीचे अंत्यदर्शन: युद्धजन्य युक्रेनमध्ये फडणवीसांची संवेदनशील डिप्लोमसी

नवी दिल्ली : युद्धजन्य युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रचिती पवार नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. युद्धस्थ परिस्थितीत अडकलेल्या देशात निधन झालेल्या आपल्या लेकीच्या पार्थिवाचे दर्शन तरी घेता येईल का ? या काळजीने तिची आई कासावीस झाली होती.

नवी दिल्ली : युद्धजन्य युक्रेनमध्ये शिकायला गेलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रचिती पवार नावाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. युद्धस्थ परिस्थितीत अडकलेल्या देशात निधन झालेल्या आपल्या लेकीच्या पार्थिवाचे दर्शन तरी घेता येईल का ? या काळजीने तिची आई कासावीस झाली होती. प्रयत्नांची शर्थ करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचितीचा मृतदेह भारतात येईल अशी व्यवस्था केली. त्यानंतर शोकाकुल कुटुंबीयांनी फडणवीसांचे आभार मानले आहेत. 

प्रचिती पवार मूळची रायगड जिल्ह्यातील रोहा येथे राहणारी मुलगी. तिचे वडील मुंबई पोलीस दलात होते. दहा वर्षांपूर्वी त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. युक्रेन येथे एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात ती शिकत होती. केसपुळीचे निमित्त झाले आणि सेफ्टीक होऊन तिचा 2 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. आई देवयानी पवार आणि मामा डॉ.तेजकुमार अपनगे असा तिचा परिवार आहे. मुलीचे अंत्यदर्शन तरी होते की नाही या काळजीने आईच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. लेकीला एकदा शेवटचे पाहता यावे अशी एकच इच्छा त्यांची होती. अशात एका परीचीताने देवेंद्र फडणवीस यांना SMS करून परिस्थिती कळवली. 

देवेंद्र फडणवीसांना याविषयीची माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने दखल घेतली. प्रचिती पवारचे पार्थिव भारतात आपल्या पातळीवर प्रयत्न सुरू केले. खासगी सचिव राजूरकर आणि  दिल्लीतील स्विय सहाय्यक मनोज मुंडे यांना फडणवीसांकडून सूचना करण्यात आल्या. मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस स्वतः परराष्ट्र राज्यमंत्री व्ही .मुरलीधरन यांच्याशी बोलले.  परराष्ट्र मंत्रालय आणि युक्रेनमधील भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क साधण्यात आला.  प्रचितीचे पार्थिव मायदेशी घेऊन येण्याचे ऑपरेशन हाती घेण्यात आले. याबाबतचे  प्रत्येक अपडेट देवेंद्र फडणवीस व्यक्तिशः जाणून घेत होते. आवश्यक त्या सूचना करत होते. सर्व अडचणी दूर होऊन प्रचितीचे पार्थिव मुंबई विमानतळावर पोहोचले. फडणवीस यांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. भाजप सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक प्रकाश गाडे त्यावेळी विमानतळावर हजर होते. तेथून प्रचितीचे पार्थिव 14 फेब्रुवारी रोजी रोहा येथे पोहोचविण्यात आले. काल तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

"आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, मी प्रत्यक्षात कधी देवाला पाहिलं नाही. पण, देवाच्या रुपात तुम्हाला पाहिले. हतबल झालेल्या कुटुंबियांना आधार देऊन एका आईला आपल्या लेकीला अखेरचा निरोप देता आला. मानवतेचे उदाहरण घालून दिले", अशी भावना प्रचितीच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget