एक्स्प्लोर

मुक्त विद्यापीठाचे 57 अभ्यासक्रम रद्द, यूजीसीची कारवाई

नाशिकः यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या 135 पैकी तब्बल 57 अभ्यासक्रमांची मान्यता विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीकडून रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठासोबतच विद्यार्थ्यांनाही देखील मोठा फटका बसला आहे.     रद्द करण्यात आलेल्या अभ्यासक्रमांमध्ये पत्रकारिता, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, डिझायनिंग, बीएससी अशा अनेक महत्त्वपूर्ण अभ्यासक्रमांचा समावेश आहे. सध्या या अभ्यासक्रमांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.   या कारवाईला विद्यापीठाची मलिन प्रतिमा कारणीभूत? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी हजारो कॉपी बहाद्दर सरकारी बाबूंना पकडण्यात आलं होतं. त्यानंतर हे विद्यापीठ जास्त चर्चेत आलं होतं.     विद्यापीठाने सुरु केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांना सहा सहा महिने पुस्तकं देखील उपलब्ध होऊ शकले नाहीत. परीक्षा उलटून दोन ते अडीच महिने झाले तरी निकालासाठी विद्यार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागते. त्याचप्रमाणे विद्यापीठातील अंतर्गत राजकारणामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास तो वेगळाच.     विद्यापीठाच्या भोगंळ कारभारच्या या तक्रारीच अभ्यासक्रम रद्द करण्यामागचं कारण आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. विद्यापीठाच्या कुलगुरुंनी या बाबत बोलण्यास नकार दिला आहे.   विद्यार्थ्यांचा आंदोलनाचा इशारा शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा आधुनिक महाराष्ट्राचे जनक यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने नाशिक मध्ये 1989 साली मुक्तविद्यापीठाची स्थापना करण्यात आली.     मुंबईच्या डबेवाल्यांपासून ते अगदी गृहिणींना उपयुक्त असे अभ्यासक्रम चालवले गेल्याने विद्यापीठाची चर्चा सर्व दूर पसरली आणि या विद्यापीठाचे नाव देशातील टॉप टेन विद्यापीठांमध्ये मध्ये येऊ लागलं. मात्र कालांतराने विद्यापीठाचा भोंगळ कारभार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चव्हाट्यावर येऊ लागला.     यावर्षी विद्यापीठाने 135 अभ्यासक्रमांची परवानगी यूजिसिकडे मागितली होती मात्र यूजिसिने केवळ 78 अभ्यासक्रमांना मान्यता देत तब्बल 57 अभ्यासक्रमांची मान्यता रद्द केली आहे. त्यामुळे रद्द झालेल्या अभ्यासक्रमात शिकत असलेले विद्यार्थी चांगलेच संकटात सापडले आहेत. विद्यार्थ्यांनी या विरोधात आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे.  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour | जगाची सफर | वर्ल्ड फटाफट | जगभरात काय घडलं? कोणत्या बातमीनं जगाचं लक्ष वेधलं ?Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget