एक्स्प्लोर

भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही : उद्धव ठाकरे 

जेंव्हा राज्यकर्त्यांचे डोळे बंद होतात तेव्हा जनता डोळ्यात अंजन टाकते. सगळ्यांचे डोळे उघडले म्हणून त्याचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी 50- 50 च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली.

मुंबई : विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये भाजप शिवसेना युतीला गेल्यावेळच्या तुलनेत कमी जागांवर यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. भाजपच्या सगळ्या अडचणी मी समजून घेऊ शकत नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. ठाकरे म्हणाले की, निवडणूक म्हटलं की हार जीत होतंच असते. युतीचे सरकार स्थापन होऊ शकेल एवढ्या जागा जनतेने दिल्या आहेत. जनतेने जागरूकतेने मतदान करत सर्वच पक्षांना जमिनीवर पाय ठेवण्याचे काम केले आहे, असेही ठाकरे म्हणाले. सर्वच पक्षाचे डोळे उघडणारा हा जनादेश आहे. जनतेने ज्या अपेक्षेनं आम्हाला आशीर्वाद दिलाय, त्या अपेक्षेवर काम करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. ठाकरे म्हणाले की, जागावाटपाच्या वेळी भाजपच्या अडचणी समजून घेऊन मी कमी जागा स्वीकारल्या आहेत. पण त्यांच्या अडचणीत वाढ होत असेल. तर मी सगळ्या अडचणी समजून घेऊन शकत नाही. आता अत्यंत पारदर्शकपणे आता दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करू. अमित शाह येतील मग आम्ही चर्चा करू, असेही ठाकरे म्हणाले. जेंव्हा राज्यकर्त्यांचे डोळे बंद होतात तेव्हा जनता डोळ्यात अंजन टाकते. सगळ्यांचे डोळे उघडले म्हणून त्याचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी ५० - ५० च्या फॉर्म्युल्याची आठवण करून दिली.  फॉर्म्युल्यावर निर्णय झाल्यावरच सरकार स्थापनेचा दावा करण्यात येईल. सत्ता स्थापनेची घाई नाही मात्र सर्व पर्याय खुले आहेत असेही ते म्हणले.. हा इशारा वगैरे नाही, पण जे ठरलं होतं त्याची आठवण करून नक्की देणार आहे, असे ते म्हणाले.  सत्तेची हाव माझ्या डोक्यात नाही, असेही ते म्हणाले. पक्ष बदलणाऱ्यांना पराभूत केलं हे सगळ्यात मोठं काम जनतेने काम केलं आहे, असेही ते म्हणाले. यावेळी आदित्यच्या विजयाबाबत बोलताना ते म्हणाले की, आईवडील म्हणून आम्हाला आदित्यचा अभिमान आहे. मी यासाठी जनतेसमोर नतमस्तक होतो. हे आशीर्वाद कायम असू द्यात, असेही ते म्हणाले. यावेळी विरोधी पक्षांवर बोलताना ते म्हणाले की, गेले पाच वर्ष झोपले होते तसे आता झोपू नका, दुसऱ्याचे चांगले झाले म्हणून मला वाईट वाटत नाही, असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget