एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सातारा दौऱ्यात शेतकऱ्याच्या लेकीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला!

शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत असताना एका शेतकऱ्याची लेक गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरेंजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. "मला साहेबांना भेटायचं आहे, मला साहेबांना भेटायचंच आहे," असं म्हणत ती गाडी जवळ गेली. मात्र ठाकरेंचे सुरक्षारक्षक तिला पुढे जाऊ देत नव्हते.

सातारा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (15 नोव्हेंबर) पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली जिल्ह्यात नुकसान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. पण साताऱ्यातील काटेवाडीत उद्धव ठाकरेंचं एक वेगळं आणि हळवं रुपही पाहायला मिळालं. आपल्या घरी येण्याचा एका शेतकऱ्याच्या मुलीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत असताना एका शेतकऱ्याची लेक गर्दीतून वाट काढत उद्धव ठाकरेंजवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. "मला साहेबांना भेटायचं आहे, मला साहेबांना भेटायचंच आहे," असं म्हणत ती गाडी जवळ गेली. मात्र ठाकरेंचे सुरक्षारक्षक तिला पुढे जाऊ देत नव्हते. अनेकांनी तिला पुढे न जाण्याचा सल्ला दिला. मात्र मला चेंगरु दे, पण मला साहेबांना भेटायचंच आहे, असा धोशा सुरुच ठेवला. मुलीची धडपड पाहून उद्धव ठाकरेंनी तिला बोलावून काय पाहिजे असं विचारलं. त्यावर तिने काहीही करा आणि माझ्या घरी चला असं सांगितलं. उद्धव ठाकरेंनी तिची समजूत घालत नंतर येईन म्हटलं. परंतु मुलीचा हट्ट कायम होता. "मी तुम्हाला जाऊ देणार नाही, तुम्ही घरी चला," असं ती वारंवार बोलत होती. अखेर मुलीची धडपड पाहून उद्धव ठाकरेंनी तिचं मन मोडलं नाही. Uddhav Thackeray | अखेर बळीराजाच्या मुलीचा हट्ट उद्धव ठाकरेंनी पुरवला | ABP Majha आपल्याच गाडीत कांचनला बसवत उद्धव यांनी थेट तिचं घर गाठलं. कांचनच्या घरी झालेलं स्वागत उद्धव यांना आयुष्यभर लक्षात राहिल असंच होतं. कांचनच्या घरच्यांनी केलेलं औक्षण पाहून स्वत: ठाकरेही भारावले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या घरी आल्यावर कांचनच्या कुटुंबियांनाही आनंदाचं भरतं आलं. मग सुरु झालं फोटोसेशन. उद्धव ठाकरेंसोबत फोटो काढण्यासाठी एकच धडपड सुरु झाली. उद्धव यांनीही सर्वांसोबत फोटो काढले. यावेळी घरातील व्यक्तींनी उद्धव यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांना थांबवलं. शेवटी कांचनचा आणि तिच्या कुटुंबीयांचा निरोप घेऊन उद्धव ठाकरे पुढच्या दौऱ्याला निघाले. राजकीय व्यासपीठावरुन विरोधकांवर शाब्दिक बाण सोडणारे, आपल्या कणखर भूमिकेमुळे सध्या चर्चेत असलेल्या उद्धव ठाकरेंनी साताऱ्यात एका लेकीचा हट्ट बापाच्या मायेने पुरवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget