एक्स्प्लोर

उद्धव ठाकरेंना 'मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अवॉर्ड' द्यावा : विखे-पाटील

आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमधील सभेत केलं होतं.

शिर्डी : उद्धव ठाकरे गोंधळलेला माणूस असून या वर्षीचा "मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अॅवार्ड" त्यांना दिला जावा, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. आम्ही सत्तेसाठी लाचार नाही, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमधील सभेत केलं होतं. या विधानाचा राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतला आहे. आज पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ करण्यात आला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना पक्ष हाच मोठा जुमला सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याची क्षमता शिवसेनेत नाही. 'जुमलेबाज सरकार' म्हणणारा शिवसेना पक्ष हाच मोठा 'जुमला' असून, सत्तेत राहून शिवसेनेचं केवळ मलिदा खाण्याचं काम सुरु आहे, अशी  विखे-पाटील केलं आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी काय काम करावं हे तुम्ही सांगायची गरज नाही. शिवसेनेने आपला स्वाभिमान केव्हाच गमावला असून थोडा जरी स्वाभिमान तुमच्यात शिल्लक असेल तर सत्तेतून बाहेर पडा, असं आव्हान त्यांनी दिलं आहे.  शिवाय या वर्षीचा "मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अॅवार्ड" उद्धव ठाकरे यांना दिला जावा, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. नितीन गडकरींना टोला मी जेव्हा राजकारणात आलो तेव्हा माझ्यावर ही टीका झाली. त्यावेळी ज्यांनी माझ्यावर आरोप केली, त्यांची मुलं नंतर राजकारणात आली. मात्र कर्तृत्व सिद्ध केल्यावरच पक्ष त्यांना स्वीकारतो. काहींच्या मुलांमध्ये दोष असेल तर त्याला नाईलाज आहे, असं टोला त्यांनी नितीन गडकरींना नाव न घेता लगावला. राजकारणी घराण्यातील पीढी सक्षम असेल तर जनता स्वीकारते, असं मतही त्यांनी घराणेशाहीबाबत व्यक्त केलं. पाणीप्रश्न सुटण्याऐवजी जटील झाला आहे कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक जिल्ह्यातील सध्याची स्थिती पाहणं गरजेचं आहे. आज अहमदनगर, नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. अशावेळी सर्वांना सोबत घेऊन समन्वयाचा तोडगा काढला पाहिजे. मात्र जायकवाडीचा मुद्दा आज राजकीय श्रेय घेण्याचा मुद्दा बनला आहे, जो बोलेल तो पुढारी चांगला, अशी स्थिती निर्माण केली जात आहे. परंतु केवळ समन्यायी पाणी वाटप कायद्याचा दरवेळी आधार घेतल्याने पाणी प्रश्न सुटण्यापेक्षा जटील होत चालला आहे, असंही विखे-पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन नोटीस; सुनिल तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संबंधित व्यक्तीसोबत माझा संवाद नाही
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धसका, बनावट FDA अधिकारी बनून 6 लाख लुटले; स्वीट मार्ट दुकानदाराच्या तक्रारीनंतर दोघांना अटक
TET Exam Paper Leak: 8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर
8 हजारांत बाहेर पडलेला पेपर 80 हजारांत विकला गेला; कशी मिळाली पहिली टिप? कसा उलगडला संपूर्ण कट, मोठा प्लॅन आला समोर

व्हिडीओ

Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया
Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE
Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
आधी बस स्टँड, आता बारामती रेल्वे स्थानकाचं रुपडं पालटलं; 11.4 कोटी खर्चून पुनर्विकास, लवकरच लोकार्पण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 जुलै 2026 | मंगळवार
MLWF : जून महिन्याच्या पगारात 25  रुपयांची कपात, जूनच्या पगारातून कपात झालेली रक्कम कुठे जमा होते? नेमके काय फायदे मिळतात?
जूनच्या पगारातून कपात झालेले 25 रुपये कुठे जमा होतात? नेमके काय फायदे मिळतात?
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
महिलांसाठी शासनाचा मोठा निर्णय, पिंक ई-रिक्षा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ; इतर जिल्ह्यांचाही समावेश
IND vs ENG : बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, पहिल्या वनडेत टीम इंडियाची दमदार कामगिरी
बुमराह- कृष्णा- गुरनूरचा इंग्लंडला दणका, इंग्लंडचा निम्मा संघ 80 धावांवर तंबूत परतला, टीम इंडियाची दमदार कामगिरी
Chhatrapati Sambhajinagar : बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
बाबा इतरांसाठी डॉन असतील, पण...; 5.5 कोटींच्या जप्तीनंतर बाबा फर्जनच्या मुलाचा संपत्तीवर दावा; महिलेबाबत मोठा खुलासा
SIR Mumbai Crime: घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...
घरी पती आजारी, एसआयआरच्या कामाचा ताण झेपेना, मुंबईत बीएलओ शिक्षिकेने शाळेतच झोपेच्या गोळ्या घेतल्या अन्...

Embed widget