एक्स्प्लोर
उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर, दुष्काळग्रस्तांना मदत करणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना शंभर ट्रक पशुखाद्य, धान्य आणि पाण्याच्या टँकरचं वाटप करणार आहेत.

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. बीड आणि जालना जिल्ह्यातल्या दुष्काळग्रस्त भागांचा ते दौरा करणार आहेत. दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना मदत मोहीम सुरु करणार असून त्याचा प्रारंभ उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात येईल. मदत मोहिमेत दुष्काळग्रस्तांना शंभर ट्रक पशुखाद्य, धान्य आणि पाण्याच्या टँकरचं वाटप करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीचीही चौकशी करणार आहेत. बीडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. कसा असेल उद्धव ठाकरेंना मराठवाडा दुष्काळ दौरा - सकाळी 9 वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन - सकाळी 10 वाजता बीड येथे हेलिकॉप्टरने आगमन - बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पशूखाद्य वाटप - सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची बीडमध्ये जाहीर सभा - दुपारी 2 वाजता जालन्याला गाडीने पोहचणार - जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांना अन्न-धान्य वाटप - संध्याकाळी 4 वाजता परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी आणि दुष्काळग्रस्तांना मदत, पिण्याच्या पाण्याचे टँकर वाटप - संध्याकाळी 7 वाजता औरंगाबादहून मुंबईकडे परतीचा प्रवास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 9 ते 16 जानेवारी दरम्यान संपूर्ण दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत.
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















