एक्स्प्लोर

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची अद्याप सहमती नाही; निकटवर्तीयांची माहिती

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव अद्याप स्वीकारला नसल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण? हे अद्याप ठरले नसल्यामुळे सत्तास्थापनेचा पेच पुन्हा वाढणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी माध्यमांना सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. त्यामुळे राज्यातील माध्यमं, राजकीय विश्लेषक आणि नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. आज (22 नोव्हेंबर) मुंबईतल्या नेहरू विज्ञान केंद्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महत्त्वांच्या नेत्यांची बैठक पार पडली. काही महत्त्वाच्या कामानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वात आधी या बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर नेहरु केंद्राबाहेर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्व पक्षांनी संमती दर्शवली आहे. परंतु शिवसेनेकडून, उद्धव ठाकरेंकडून अद्याप त्यास दुजोरा मिळालेला नाही. नेहरु केंद्रात सुरु असलेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह धरला होता, तसेच महाविकासआघाडीचे नेतृत्व उद्धव ठाकरेंनीच करावं, असा सूर या बैठकीत पाहायला मिळाला. परंतु उद्धव ठाकरेंनी त्यास अद्याप संमती दिलेली नाही. मुख्यमंत्री हा महाविकासआघाडीमधील सर्व पक्षांच्या आमदारांचे, गटनेत्यांचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना असे वाटते की, उद्धव ठाकरे यांनीच महाविकास आघाडीचे नेतृत्व करावे. महाविकासआघाडीच्या मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्री, दोन माजी उपमुख्यमंत्री, तसेच आतापर्यंत अनेकवेळा कॅबिनेट मंत्रीपदं भूषवलेले नेते असणार आहेत. त्यामुळे अशा नेत्यांचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ उद्धव ठाकरेंमध्येच आहे, असे आघाडीतील नेत्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, ठाकरे कटुंबांच्या आतापर्यंतच्या इतिहासात ठाकरे घरातील कोणत्याही व्यक्तीने कधीही मंत्रीपद भूषवलेले नाही. ठाकरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती नेहमीच मंत्रीपदापासून दूर राहात आलेली आहे. त्यामुळे आघाडीतीन नेत्यांचा मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा प्रस्ताव उद्धव ठाकरे स्वीकारणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर महाविकासआघाडीची सहमती, शरद पवारांची माहिती | मुंबई | ABP Majha मुख्यमंत्रीपदाचा आग्रह उद्धव ठाकरेंनी स्वीकारला, संजय राऊतांची एबीपी माझाला माहिती | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; रेस्कू ऑपरेशन सुरू, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'मध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; रेस्कू ऑपरेशन सुरू, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Maharashtra Breaking News LIVE: ठाण्यात पावसाचा जोर वाढला! वंदना डेपो, बाजारपेठ परिसरात पाणी साचण्यास सुरुवात
Mumbai Metro: गर्दीच्या वेळी 'अंधेरी ते घाटकोपर' विशेष फेऱ्या; मेट्रो 1 ची 'मिक्स्ड लूप' चाचणी यशस्वी, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर
गर्दीच्या वेळी 'अंधेरी ते घाटकोपर' विशेष फेऱ्या; मेट्रो 1 ची 'मिक्स्ड लूप' चाचणी यशस्वी, प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा, जाणून घ्या सविस्तर
Weather Update Marathwada Rain: मराठवाडा- विदर्भात पुढील 48 तास पावसाचे महत्त्वाचे अलर्ट; शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या, पुढील 5 दिवस कुठे काय?
मराठवाडा- विदर्भात पुढील 48 तास पावसाचे महत्त्वाचे अलर्ट; शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या, पुढील 5 दिवस कुठे काय?

व्हिडीओ

Siya Goyal Cafe : 'याच' कॅफेमध्ये सियाने रचला होता केतनला ढकलण्याचा कट
Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
'अशी कोणती नावे आहेत, ज्यांच्यामुळे बृजभूषण यांना सुद्धा धोका वाटतो?' शक्तिशाली लोकसुद्धा नावे घेण्यास घाबरतात; राम मंदिरातील लुटीवरून अरविंद केजरीवालांचा खोचक सवाल
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'ध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; रेस्कू ऑपरेशन सुरू, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
धक्कादायक! मुंबईत 'मॅनहोल'ध्ये पडला माणूस, फक्त छत्री अन् चप्पल आढळली; रेस्कू ऑपरेशन सुरू, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
दगडी खाणीत 40 फूट उंचीवरून महाकाय दगड अंगावर कोसळला; रोजंदारीवरील आठ कामगार जाग्यावर गतप्राण, जखमीचा आकडा अजूनही निश्चित नाही
Ketan Agrawal Case Pune: हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
हातात बाटली, फोनवरून मोठ्या आवाजात शिव्या अन् नंतर चेतनला मारलेली मिठी, सियाचा पबमधील VIDEO समोर
Gokul Election: 'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
'गोकुळ' गुजरातच्या दावणीला बांधायचा आहे का? जाब विचारण्याची धमक महायुतीमधील एकाही नेत्यामध्ये नाही; राजू शेट्टींचा हल्लाबोल
Pune News: पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाचं निलंबन, रात्रीच्या वेळी गस्त घालतानाची कॅफेतील 'ती' चूक नडली, व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Ram Mandir: राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
राम मंदिरातील दानपेटीतील राजरोस लूट, आता आरोपीचा भाऊ हातात नोटांचा ढीग घेऊन जातानाचा व्हिडिओ समोर!
England vs India, 1st T20I: पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
पहिल्या टी-20 सामन्यात पावसाचा खेळ झाला, पण अभिषेक शर्मा अन् कॅप्टन श्रेयस अय्यरनं पराक्रम नावावर केला
Embed widget