एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : राम मंदिर सोहळ्याचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं, स्पीड पोस्टद्वारे आमंत्रण पत्रिका पाठवली

Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं असून स्पीड पोस्टद्वारे निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आलीये.

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राम मंदिर (Ram Mandir) उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. स्पीड पोस्टद्वारे हे निमंत्रण उद्धव ठाकरेंना पाठवण्यात आल्याची माहिती समरो आलीये. पण उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं असलं तरीही ते 22 जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यामुळे स्पीड पोस्टद्वारे जरी हे निमंत्रण पाठवण्यात आलं असलं तरीही या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं याआधीच उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील प्रमुख पक्षांच्या पक्षप्रमुखांना निमंत्रित करण्यात आलंय. त्यानुसार शरद पवार, राहुल गांधी, सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरेग आणि आता उद्धव ठाकरे यांना देखील या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलंय. पण सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच शरद पवारही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार नाहीत. 

मंदिर पूर्ण झाल्यानंतर अयोध्येत जाणार - शरद पवार

मी अयोध्येला जाणार आहे पण 22 जानेवारी नंतर आणि जेव्हा मंदिर पूर्ण होईल तेव्हा, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. त्यामुळे शरद पवार देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तसेच उद्धव ठाकरे हे देखील 22 जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊन पूजा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेही या सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. 

असा असेल उद्धव ठाकरेंचा नाशिकमधील संभाव्य दौरा

22 तारखेला आयोद्धेत राम मंदिर लोकार्पण सोहळा होत असताना नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनची आणि उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याची धूम राहणार आहे. शनिवारपासून शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी नाशिकमध्ये दाखल होतायत. 

  • उद्धव ठाकरे 22 जानेवारीला सकाळी 11 वाजता मातोश्रीहून रवाना होतील. विमानाने त्यांच्या ओझर विमानतळावर आगमन होईल.
  • 1 वाजता ते ओझरहून भगूरला जाणार, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात जाऊन सावरकरांना अभिवादन करणार.
  • 2 वाजता भगूरहून रॅडिसन ब्ल्यू  हॉटेलकडे जाणार.
  • सायंकाळी 5.30  वाजता काळाराम मंदिराकडे निघणार. काळाराम मंदिरात दर्शन घेऊन पूजा करणार.
  • 6.30 वाजता गोदा घाटावर येऊन गोदावरीची महाआरती करणार.
  • दुसऱ्या दिवशी 23 तारखेला बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्ताने अभिवादन करून महाअधिवेशनाला सुरुवात होणार, 10 ते 2
  • वाजेपर्यंत प्रमुख वक्ते बोलणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने शिबिराचा समारोप होईल.
  • सायंकाळी 7 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. मात्र सुरुवातीला जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे.

हेही वाचा : 

Uddhav Thackeray : नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन; 'असा' असेल उद्धव ठाकरेंचा संभाव्य दौरा

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Embed widget