Uddhav Thackeray on Kirit Somaiya Video : सध्या राज्याच्या राजकारणात एकीकडे मोठा भूकंप आला असताना दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचं व्हायरल व्हिडीओ प्रकरण चर्चेत आहे. किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ (Kirit Somaiya Viral Video) प्रकरणावर आता शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांची किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणावर बोलताना म्हटलं आहे की, ''मी किळसवाणे व्हिडीओ बघत नाही.''


''मी किळसवाणे व्हिडीओ बघत नाही.''


विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी किरीट सोमय्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. यावेळी प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मी असे किळसवाणे आणि विभत्स व्हिडीओ बघत नाही. परंतु त्यावर राज्यातील जनतेने खास करून माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला वाटत त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे.''


'देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी पक्षांची एक आघाडी'


यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडी बाबतही वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ''काल ही गोष्ट अत्यंत स्पष्टपणाने देशभरात पोहोचली आहे. काल आणि परवा दोन दिवस बंगळुरुमध्ये देशप्रेमी पक्षांची एक बैठक झाली. देशप्रेमी आणि लोकशाही प्रेमी पक्षांची एक आघाडी स्थापन झाली आहे आणि या आघाडीचं नाव इंडिया असं आहे.'


''ही हुकूमशाही विरोधातील लढाई''


विरोधी पक्ष एकत्र येण्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले की, ''ही लढाई कोणत्या एका व्यक्तीविरोधात किंवा कोणत्याही एका पक्षाविरोधात नाही. कारण पक्ष येत असतात, नेते येत असतात जात असतात, पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील. हे सातत्याने येणारी-जाणारी लोक असतात. परंतु जो पायंडा पडतो आहे, तो पायंडा देशासाठी घातक आहे. म्हणून सगळे जण जे लोकशाही प्रेमी आणि देश प्रेमी पक्ष आहेत, ते एकत्र येऊन या हुकूमशाहीच्या विरुद्ध एक मजबूत आघाडी तयार झाली आहे. ''


सोमय्या व्हिडीओ प्रकरणी राज्य महिला आयोगाचे निर्देश


किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत.


संबंधित इतर बातम्या :