Sushma Andhare on Kirit Somaiya : अधिवेशनाच्या काळात भाजप नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) व्हिडीओ बाहेर काढण्यात भाजपचाच हात आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केलं आहे. किरीट सोमय्यांनी आतापर्यंत ज्यांच्यावर आरोप केले. त्यांचे घोटाळे बाहेर काढले, ते सगळे नेते आता भाजपसोबत आहेत. त्यामुळे सगळ्यांना चांगलं ठरवण्यासाठी भाजपने किरीट सोमय्यांचा व्हिडीओ बाहेर काढून तो व्हायरल केला असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी भाजपवर केला आहे. त्यांनी पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली आहे.


'विविध कारणांमुळे 40 महिलांची फसवणूक केली'


किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडीओसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या की, ''चर्चा करावी असा हा व्हिडीओ नाही. प्रत्येक व्यक्तीबद्दल ते काय बोललं? त्यांनी का केलं याचा परिणाम होत असतो. आता अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्याचं वस्त्रहरण केलं आहे. किरीट सोमय्यांकडून 40 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ईडी, सीबीआय चौकशी लावण्याच्या धमकी देत अधिकाऱ्यांच्या घरातील महिलांचं शोषण करण्यात आलं आहे. 30-35 व्हिडीओ आहेत. किमान तीन साडे तीन तासाचा व्हिडीओ आहे. भाजप पद देतो, घटस्फोट करून देतो, अस सांगून फसवणूक केली आहे. त्यामुळे हे योग्य नाही. भाजपचे लोक काहीही करताना दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.''


'भाजप बाकी नेत्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतंय'


सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, ''यासंपूर्ण प्रकरणात महिलांची गोपनीयता जपली पाहिजे. किरीट सोमय्यांनी जे काही केलं ते वाईटच आहेत. मात्र भाजपने यापूर्वी अनेक गोष्टी लपवल्या आणि जिरवल्या आहेत. किरीट सोमय्यांची भाजपसाठीची उपयुक्तता संपली आहे. त्यामुळे त्यांचा व्हिडीओ आता अधिवेशनाच्या काळात बाहेर काढला आहे. गृहमंत्री त्यांच्यावर कारवाई करतील का असा प्रश्न आहे?'' दरम्यान, या अगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली. पण, त्यांनी केली नाही मग आताच हा व्हिडीओ बाहेर काढून भाजप बाकी नेत्यांना चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंधारे म्हणाल्या. 


'बोले तैसे न चाले त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस'


प्रदीप कुरुलकरांच्या प्रकरणातील व्हिडीओदेखील बाहेर आले नाहीत, पण भाजपच्या परवानगीशिवाय किरीट सोमय्यांचे व्हिडीओ बाहेर काढले आहेत, असंही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही म्हणणारे, देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसशी युती केली. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले, पण बोले तैसे न चाले त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे, असा टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला आहे. 


हेही वाचा :


Kirit Somaiya Video : किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस