Uddhav Thackeray Live : जरांगे, कोश्यारी, शिंदे ते अदानी, उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, पाहा भाषणातील ठळक मुद्दे
Uddhav Thackeray Live : तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगती मशाल निखारा माझ्याकडे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.
Uddhav Thackeray Dasara Melava 2023 Live: शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांनी घणाघाती भाषण केले. या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र सरकारवरही टीका केली. जरांगे पाटील यांचे त्यांनी आभारही व्यक्त केले. त्याशिवाय मराठा आरक्षणाची मागणी मान्य करण्यासाठी संसदेच्या अधिवेशनात विशेष कायदा का केला नाही असा सवालही त्यांनी केला. तुमची खोक्याची लंका दहन करणारा धगधगती मशाल निखारा माझ्याकडे आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे पाहूयात..
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
सीतेप्रमाणे शिवसेना पळवण्याचा प्रयत्न केला.
ज्या प्रमाणे हनुमानाने रावणाची लंका दहन केली होती. त्यांची खोक्याची लंकाही दहन करायची आहे. मेळाव्यानंतर खोकेसुरांचे दहन करणार
मी मुख्यमंत्री असताना कधी कुणावर लाठीचार्जचा आदेश दिला होता का? पोलीस वरून आलेल्या आदेशानंतरच लाठीचार्ज केला. मग, आता तेच पोलीस लाठीमार करत आहेत हा आदेश देणार डायर कोण होता?
गद्दारांमध्ये हिम्मत असेल तर हा आरक्षणाचा प्रश्न सोडवा. पोट कोणत्याही जातीचे असो ते भरायलाचा पाहीजे हे राज्यकर्त्यांचे काम असते. हा आरक्षणाचा विषय सोडवायचा असेल तर संसदेत सुटेल. न्यायालयाचा निर्णय बदलायचा अधिकार संसदेला असतो.
जरांगे पाटलांना मी धन्यवाद देतोय, ते यांच्यासाठी की भाजप जे जातीपातीचे राजकारण करतायत ते आपण मोडून काढू...
मला कोणाचा अपमान करायचा नाही पण.. पुढची केस कोणती आहे ते विचारताच एका 20 वर्षीय मुलीची छेड काढली सांगितले जाते आणि एक आजोबा काठी टेकत येतात.. न्यायाधीश म्हणतात तुम्ही एवढे वयस्कर तरी असं.. तेव्हा आजोबा म्हणतात ही केस जुनी आहे पण अजून सुरू
भारत मातेची लोकशाही टिकणार की नाही ? 30 तारखेला बघू.. जनतेच्या न्यायालयात जाऊ द्या असं मी म्हणतो. मला सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे.
सगळीच घराणेशाही वाईट नाही.. कोण कोणत्या घराण्यातील त्यावरून त्याची ओळख ठरते.. सर्वोच्च न्यायालयाचे चंद्रचूड यांचे मी उदाहरण देईल, त्यांचे वडील पण न्यायाधीश होते.
संजय राऊत भ्रष्ट्राचारावर बोलले, पण उद्या सरकार आपले येणारच.. आम्हाला आज त्रास देतायत पण तुम्हाला उलटे टांगू..
हनुमान चालीसा वाले कुठे गेले ? पण व्यंकटेश स्तोत्रात लिहिले आहे की गटार गंगेत गेले तर त्याचे तीर्थ होते..
किती जणांना बुलेट ट्रेनचा उपयोग होणार.. इथल्या गदारांना पटकन गुजरातला पळता यावे म्हणून ही बुलेट ट्रेन
जो कोणी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे होतील
नीती आयोगाच्या माध्यमातून विकास का ? काय आहे ते आयोग ? तो पालकमंत्री पण एक बिल्डर.. बिल्डरचे कार्यालय पालिकेत थाटले आहे
खिचडी मध्ये काय केलं, औषधात काय केलं हे विचारतायत
मुंबई आर्थिक राजधानी आहे का ? कारण सगळे गुजरातला चालले आहे, फिल्मसिटी उत्तर प्रदेशाला नेतायत
कोरोना काळातील घोटाळे चौकशी करतायत तर मग ठाणे, पुणे, नागपूर महापालिकेची पण करा.. हिम्मत असेन पीएम केअर आणि जम्मू पर्यंत करा
मुंबई आर्थिक राजधानी आहे का ? कारण सगळे गुजरातला चालले आहे, फिल्मसिटी उत्तर प्रदेशाला नेतायत
आम्ही मुंबई, महाराष्ट्र वाचवले त्याचे कौतुक नाही
आमच्या अंगावर येतायत पण शेण हे खातायत
पीएम केअर फंड घोटाळ्याचं काय ?
आरोग्य यंत्रणाचे सध्या तीन-तेरा वाजले.
तुमची ती काळी टोपी.. किती विक्षिप्त लोकं असतात.. कळत नाही टोपी खाली दडलंय काय ? (कोशारीवर टीका असावी)
धारावीचा विषय मी बघणार आहे.. कोण तो तुमचा मित्र ? माझे डोळे पांढरे झाले दिडशे कोटींचा Fsi.. हा विकास मित्राचा विकास करायला
धारावीचा विकास तुमच्या मित्राच्या खिशात जाणार असेन तर आम्ही ते होऊ देणार नाही, रस्त्यावर उतरू