एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती? उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका

Uddhav Thackeray : राज्यात आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे याची सरकारला माहिती कशी नव्हती?: उद्धव ठाकरे

Jalna Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी येथे करण्यात येत असलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी शुक्रवारी पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये झालेल्या वादानंतर राजकीय वातावरण तापले आहेत. जालना येथे पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देखील मुख्यंमत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली आहे. दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 

जालना येथील घटनेवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता. आज संध्याकाळी मी जालना जाणार आहे. नुसता निषेध करून चालणार नाही. विशेष म्हणजे यापूर्वीच सरकारवर ताशेरे न्यायालयाने मारले आहेत. आमची इंडियाची बैठक सुरु असताना एकाने पत्रकार परिषद घेतली. आमच्यावर लक्ष देण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे, पण राज्यात आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे याची यांना माहिती नाही. मुख्यंमत्री आणि गृहमंत्री यांना राज्यात काय सुरु आहे, कोठे आंदोलन सुरु आहेत याची रोज माहिती मिळत असते. पण दोन फुल, एक हाफना आंदोलनाची कल्पना नव्हती का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. तर लाठीचार्ज करण्याचा आदेश कोणी दिला होता.  आता चौकशी करून तुम्ही काय करणार, नुसत्या चौकश्या लावल्या जाताय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 

उद्धव ठाकरे जालना दौऱ्यावर! 

जालना येथील घटनेनंतर उद्धव ठाकरे आज संध्याकाळी जालना येथील दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई येथून उद्धव ठाकरे औरंगाबाद विमानतळावर पोहचतील, तेथून कारने ते जालना येथे जाणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे पोलिसांच्या लाठी हल्ल्यात जखमी झालेल्या गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार आहेत. त्यानंतर ते अंतरवाली सराटी गावात जाऊन आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्ते यांची भेट घेणार आहे. यावेळी ते गावकऱ्यांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे. 

असा असणार उद्धव ठाकरेंचा दौरा...

  • सायंकाळी 5.00 वाजता मुंबईहून औरंगाबादकडे प्रयाण
  • 5.45वाजता औरंगाबाद विमानतळावर आगमन होणार
  • 05.55 वाजता औरंगाबाद येथून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावाकडे रवाना
  • 7.00 आंतरवाली सराटी येथे आगमन आणि गावकरी यांची भेट.
  • 7.25 अंबडकडे रवाना
  • 7.50 अंबड शासकीय रुग्णालयात आंदोलक भेट
  • 8.15 औरंगाबाद विमानतळावर प्रयाण
  • 9.00 औरंगाबाद विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna Protest : मुंबईच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 ऑगस्ट 2026 | बुधवार

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे

Embed widget