एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्याची शक्यता, यवतमाळमधून आमदार होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरुन आमदार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठी ते यवतमाळ विधानपरिषदेमधून निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यवतमाळ : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्यानंतर अखेर राज्यातला सत्तापेच सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले आहे. परंतु उद्धव ठाकरे हे निवडून आलेले आमदार नाहीत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत विधीमंडळाचे (विधानपरिषद किंवा विधानसभा) सदस्यपद मिळवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरून आमदार होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यासाठी ते यवतमाळ विधानपरिषदेमधून निवडणूक लढतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यावर शिवसेनेची चांगलीच पकड आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ मतदारसंघात तशी चाचपणी सुरु केली आहे. यापूर्वी शिवसेना नेते तानाजी सावंत हे यवतमाळ विधान परिषदेचे सदस्य होते. आता ते उस्मानाबाद जिल्ह्यातून भूम-परांडा विधानसभेवरुन आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे ही जागा आता रिकामी झाली आहे. परिणामी उद्धव यांनी यवतमाळ विधानपरिषदेमधून निवडणूक लढवावी, अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरु आहे. यवतमाळ मतदारसंघात एकूण 439 मतदार आहेत. मागील वेळी येथून शिवसेनेचे तानाजी सावंत यांना 378 मतं मिळाली होती. तनाजी सावंत यांनी ही जागा जिंकल्यामुळे या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. हा मतदारसंघ सुरक्षित असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथून उभे राहावे, असा सल्ला शिवसेना नेत्यांनी दिला आहे. तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचीदेखील हिच मागणी आहे. उद्धव ठाकरे यवतमाळमधून विधानपरिषदेवर निवडून गेले तर विदर्भातील लोकांना आनंद होईल. तसेच ते थेट विदर्भाशी जोडले जातील. अशा चर्चादेखील शिवसेनेच्या विदर्भातील नेत्यांमध्ये सुरु आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला | ABP Majha जगेन असं वाटत नव्हतं पण सर्वांच्या आशीर्वादाने मंत्री झालो : छगन भुजबळ | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 
सावधान! राज्यातील 'या' भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा, पुढील तीन दिवस कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याचा दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर; सोने चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
रिझर्व्ह बँकेकडे सोन्याचा किती साठा? केंद्र सरकारकडून राज्यसभेत आकडेवारी सादर
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Embed widget