सातारा: खासदार उदयनराजे आपल्या हटके शैलीमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी आपली कॉलर उडवल्यामुळे तर कधी पुष्पा चित्रपटातील डॉयलॉगमुळे त्यांची सर्वत्र चर्चा होते. आताही ते चर्चे आले आहेत, पण त्याचं कारण काहीसं वेगळं आहे. गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता एक मोठी घोषणा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. त्यासाठी सर्वांना आमंत्रणही त्यांनी दिलं आहे. आता उदयनराजे कोणती मोठी घोषणा करणार याची चर्चा मात्र सर्वत्र रंगली आहे.
खासदार उदयनराजेंच्या वतीनं एक निवेदन जारी करण्यात आलं आहे. हे विशेष निमंत्रण सर्व पत्रकार आणि जनतेस असल्याचं त्यांनी सुरुवातीला नमूद केलं आहे. या निवेदनात ते म्हणतात की, या 24 तारखेला एक मोठा घोषणा करायचं मनात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या या वातावरणात पहिल्याच वाक्याने ज्या ज्या शक्यता तुमच्या डोक्यात आल्या असतील त्यामधले काहीच नसणार आहे. उपक्रम अभिनव आहे तेव्हा हे आमंत्रण पण फार औपचारिक अशा धाटणीचे आहे.
खासदार उदयनराजे पुढे म्हणतात की, आपण सारेच आपल्या भोवती सुरू असणाऱ्या घटना पाहत असतो. काही अयोग्य वाटल्या तर त्या कोणीतरी दुरुस्त करेल अशी इच्छा आपण व्यक्त असतो. आम्ही मात्र एका सामाजिक प्रश्नावर गेली अनेक वर्षे प्रशासकीय बदलांसाठी अनेक प्रयत्न केले. पण ते पुरेसे नाहीत. गेल्या काही दिवसांच्या चिंतनातून आम्ही या प्रश्नाचे उत्तर म्हणून स्वत:च एक व्यवस्था उभी करण्याचं ठरविले आहे. कोणता प्रश्न, काय व्यवस्था... अशा प्रश्नांच्या उत्तरांसाठी आम्ही आपणास सदर पत्राने आमंत्रण देत आहोत.
खासदार उदयनराजेंनी गुरुवारी संध्याकाळी सर्वांना साताऱ्यातील गांधी मैदानात हजर राहण्याचं आवाहन केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Udayanraje: 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात उदयनराजेंची फिल्मी स्टाईल एन्ट्री
Udayanraje On Pushpa : उदयनराजेंची हटके स्टाईल, 'पुष्पा'चा डायलॉग मारत पुन्हा एकदा उडवली कॉलर