मुंबई: शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्याला आता ड्रग्जने विळखा (Pune Drugs) घातल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या चार दिवसात पुण्यामध्ये हजारो कोटींचे मेफेड्रॉन ड्रग्ज सापडले असून त्याचे जाळे हे दिल्लीपर्यंत पसरल्याचं दिसून आलंय. पोलीस आता या प्रकरणी वेगवेगळ्या शहरात कारवाई करत असून अजूनही मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यासंबंधित सविस्तर माहिती खालीलप्रमाणे,


भारतात मिळणाऱ्या ड्रग्जचे प्रकार 



  • अल्प्रोझोलम  (कुत्ता गोली)

  • मेफेड्रॉन (एमडीएमए/ एक्सटसी / म्याऊ-म्याऊ / पार्टी ड्रग्ज)

  • कोकेन

  • हेरॉईन (ब्राऊन शुगर)

  • चरस

  • गांजा (कॅनाबिस)

  • भांग (कॅनाबिस)

  • अफू (ओपियॉईड)


ड्रग्ज घेणाऱ्यांची लक्षणे 



  • व्यक्तीच्या वागण्यात बदल.

  • अभ्यास, खेळात, दैनंदिन कामांमध्ये लक्ष न लागणं.

  • घरात इंजेक्शन, सिरींज आढळणे.

  • डोळे लाल आणि निस्तेज होणे, डोळ्यांखाली सूज येणे.

  • बोलताना अडखळणे, उभे राहिल्यावर तोल जाणे.

  • सतत नैराश्य, तणावात असणे, भूक मंदावणे.

  • निद्रानाश, स्मरणशक्तीत घट, आक्रमकता, भास होणं अशी लक्षणं.

  • फुफ्फुस आणि इतर आजारांत वाढ.


राज्यात ड्रग्जचा वाढता विळखा 



  • ओपियॉईड, कॅनाबीसचं व्यसन असणाऱ्यांच्या संख्येत देशामध्ये महाराष्ट्र पहिल्या पाचमध्ये.

  • धूर, वाफ किंवा एरोसोल स्प्रेच्या माध्यमातून किंवा तोंडावाटे घेतलं जातं.

  • इन्हेल किंवा इंजेक्शनद्वारे सेवन केले जाणारे अंमली पदार्थ.

  • सिडेटिव्ज किंवा वेदना शामक औषधं.

  • गांजा थेट मेंदूवर आणि मानसिकतेवर परिणाम करतो.

  • आर्थिक मंदी, वाढती बेरोजगारी, ताणतणाव आणि मानसिक आजारांत व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक.

  • अंमली पदार्थांची सहज उपलब्धता व्यसनाधीनता वाढण्यास कारणीभूत.


ड्रग्ज घेतल्यास काय आहे शिक्षा?



  • भारतात ड्रग्जचं सेवन गंभीर गुन्हा

  • ड्रग्ज बाळगल्यास किंवा सेवन केल्यास 10 ते 20 वर्षांची शिक्षा.

  • किमान 1 लाख रुपयांचा दंड


व्यसनांच्या विळख्यातून मार्ग कसा काढणार?



  • मोहात पडू नका.

  • चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचा पुरस्कार करा.

  • विशेषतः लहान मुला-मुलींवर नीट लक्ष ठेवणं गरजेचं.  


पुण्यात अनेक ललित पाटील 


एक ललित पाटील गजाआड झाला तरी मेफेड्रॉनची निर्मिती आणि विक्री थांबली नाही. कारण असे अनेक ललित पाटील केमिकल कंपन्यांच्या बुरख्याआड काम करतायत. महाराष्ट्रातील एमआयडीसीमधील या केमिकल कंपन्या मेफेड्रॉन निर्मीतीची आणि पर्यायानं ड्रग माफियांची केंद्रं आहेत. तिथे सातत्यानं नजर ठेवण्याची गरज आहे. फर्टिलायझर तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यापासून तयार होणारं मेफेड्रॉन म्हणूनच इतर अंमली पदार्थांपेक्षा घातक ठरतंय.


ही बातमी वाचा: