एक्स्प्लोर
कोल्हापूरमधील वडणगे नदीत मुंबईतील दोन तरुण बुडाले, शोधकार्य सुरु
कोल्हापूर: कोल्हापूरमध्ये नदीपात्राममध्ये दोन तरुण बुडाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वडणगे स्मशानभूमी घाटाजवळील नदीपात्रात ही घटना घडली आहे.
ही दोन्ही मुलं मुंबईतील सायनचे रहिवासी आहेत. हे दोघंही तीन दिवसांपूर्वी सुट्टीसाठी कोल्हापुरला आले होते. मात्र, नदीत खेळताना ते बुडाले. गणेश खोपकर आणि मयूर बनसोडे असं या मुलांचं नाव आहे.
दरम्यान, सध्या नदीपात्रात त्यांचा शोध घेतला जात आहे. नदीपात्रात उतल्यानंतर त्यांचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. गेले तीन दिवस हे दोघेही नदीवर जात होते. मात्र आज हे तरुण नदीवर गेले असताना खोल नदीपात्रात ते बुडाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement