एक्स्प्लोर

भंडाऱ्यात अपघातांचं सत्र! एका अपघातात ट्रॅक्टरने तर दुसऱ्या अपघातात टिप्परने दुचाकीस्वराला चिरडले, दोघांचा मृत्यू 

भंडाऱ्यात आज दोन ठिकाणी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा चिरडून मृत्यू झाला आहे. एका घटनेत ट्रॅक्टरनं तर, दुसऱ्या घटनेत वाळूच्या टिप्परनं दुचाकीस्वाराला चिरडलं आहे.

Bhandara : भंडाऱ्यात आज दोन ठिकाणी भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोघांचा चिरडून मृत्यू झाला आहे. एका घटनेत ट्रॅक्टरनं तर, दुसऱ्या घटनेत वाळूच्या टिप्परनं दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातातील मृतांमुळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

भंडाऱ्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

भंडाऱ्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हे दोन्ही अपघात रात्री आठ वाजताच्या सुमारास घडले असून मृतक हे दुचाकीस्वार आहेत. पहिली घटना भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यात डोंगरगावजवळ घडली असून त्यात ट्रॅक्टरनं दुचाकीस्वार संजय खोब्रागडे (42) यांना चिरडलं. तर, दुसरा अपघात भंडारा ते लाखनी या राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी गावाजवळ घडला. राष्ट्रीय महामार्गावर रॉंग साईड जाणाऱ्या भरधाव वाळूच्या टिप्पण दुचाकीस्वार राजू भोयर (45) यांना चिरडलं. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोहाडी येथील घटनेतील मृत इसम हा मोहाडी तहसील कार्यालयात अर्जनवीस म्हणून काम करीत होता. तर, पलाडी गावाजवडील घटनेत मृत पावलेला इसम हा एका राईस मिलवर सुरक्षारक्षक म्हणून कर्तव्यावर जात असताना हा अपघात घडला. या भीषण अपघात प्रकरणी आंधळगाव आणि कारधा पोलिसात वाहन चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या अपघातामुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गडचिरोलीत मालवाहू ट्रकने धडक दिल्याने सख्खे भाऊ जागीच ठार

गडचिरोली शहरात धक्कादायक घटना घडली आहे. मालवाहू ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना गडचिरोली शहरापासून एक किलोमीटर अंतरावर आरमोरी मार्गावर घडली आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतात पीक फवारणीसाठी गेल्यानंतर दुचाकीने घराकडे परत येत असताना मालवाहू ट्रकने धडक दिल्याने सख्खे भाऊ जागीच ठार झाले आहेत. पुरुषोत्तम बारसागडे आणि अंकुश बारसागडे अशी मृतांची नावे आहेत. ते गडचिरोली शहरातील हनुमान वार्ड प्रभागातील रहिवाशी होते. दोघे भाऊ फवारणीसाठी शेतात गेल्यानंतर घराकडे परत येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळं एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच सावधानता बाळगल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget